Sharad Pawar Z Plus Security: सरकारने शरद पवारांना आत्ताच का दिली Z प्लस सुरक्षा?
Sharad Pawar On Z Plus Security: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना झेड प्लस सेक्युरिटी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत निर्देश दिले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
झेड प्लस सुरक्षेबाबत माहितीय का?
'झे प्लस' सुरक्षेबाबत शरद पवार काय म्हणाले?
अन्य दर्जाच्या सुरक्षेबाबतही जाणून घ्या सविस्तर माहिती
Sharad Pawar On Z Plus Security: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) निर्देश दिले आहेत. या सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या ५५ सशस्त्र कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आलं आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा का देण्यात आलीय? असा सवाल राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. (why z plus security given to ncp chief sharad pawar before maharashtra vidhansabha election 2024)
या सुरक्षेबाबत प्रतिक्रिया देतान शरद पवारांनी शंका उपस्थित केली आहे. "काल माझ्याकडे गृहखात्याचे अधिकारी आले होते. कदाचित निवडणुका आहेत. झेड प्लस सेक्युरिटी म्हणजे अधिकृत माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते. नक्की काय आहे मला माहित नाही", अंस पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
'झे प्लस' सुरक्षेबाबत शरद पवार काय म्हणाले?
"काल माझ्याकडे गृहखात्याचे अधिकारी आले होते. कदाचित निवडणुका आहेत. झेड प्लस सेक्युरिटी म्हणजे अधिकृत माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते. नक्की काय आहे मला माहित नाही. देशात तीन लोकांच्या संबंधीचा निर्णय घेतला आहे. आरएसएचे प्रमुख भागवत त्यांचंही नाव सांगितलं. देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि मला झेड प्लस सेक्युरिटी दिली आहे". शरद पवारांना धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणांनी ही सुरक्षा दिलं असल्याचं सांगितलं जात आहे. तसच केंद्र सरकारने पवारांना व्हीआयपी सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज कोल्हापूर बंदची हाक
झेड प्लस सुरक्षेबाबत माहितीय का?
सुरक्षेच्या येलो बुकनुसार शरद पवारांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. पवारांना दिलेल्या सुरक्षेत ५८ कमांडो तैनात असतील, अशी माहिती आहे. झेड प्लस कॅटगरिच्या सुरक्षेत १० आर्म्ड स्टॅटिक गार्ड, 6 PSO (एकाच वेळी राउंड द क्लॉक), २ जवान (एस्कॉर्टमध्ये राउंड द क्लॉक), ५ पहारेकरी (दोन शिफ्ट मध्ये राहतात). एक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उप निरीक्षक इंचार्ज म्हणून तैनात असतात. व्हीआयपींच्या घरी येजा करणाऱ्या लोकांसाठी ६ फ्रिस्किंग आणि स्क्रीनिंग करणारे तैनात असता. तसच राउंड द क्लॉक ट्रेंड ६ ड्रायव्हर असतात.










