‘शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाचवेळा असं पत्र लिहिलं होतं’, भाजप प्रवक्त्याचं वादग्रस्त विधान
‘वीर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली. ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली,’ या राहुल गांधींच्या विधानाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणातही उमटले. या विधानावरून राहुल गांधींना उत्तर देताना भाजपच्या प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापाठोपाठ भाजप प्रवक्त्यानं केलेल्या विधानावरून काँग्रेसनं टीकास्त्र डागलंय. वीर सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याच्या राहुल गांधींच्या आरोपाला भाजपकडून प्रत्युत्तर […]
ADVERTISEMENT

‘वीर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली. ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली,’ या राहुल गांधींच्या विधानाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणातही उमटले. या विधानावरून राहुल गांधींना उत्तर देताना भाजपच्या प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापाठोपाठ भाजप प्रवक्त्यानं केलेल्या विधानावरून काँग्रेसनं टीकास्त्र डागलंय.
वीर सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याच्या राहुल गांधींच्या आरोपाला भाजपकडून प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं दिसत आहे. त्यातच आता भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानानं नव्या वादानं डोकं वर काढलंय. भाजपचे प्रवक्ते सुधाशू त्रिवेदी यांनी आज तक वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात हे विधान केलं.
वीर सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना सुधांशू त्रिवेदी म्हणाले, “सावरकरांनी माफी मागितली, हे जे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता माफीनाम्याची गोष्ट आहे, तर त्या काळात अनेक लोक बाहेर पडण्यासाठी एका विशिष्ट प्रकारे माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. त्याचा अर्थ काय?”, असं विधान सुधांशू त्रिवेदीनं केलंय.
भगतसिंह कोश्यारीचं वादग्रस्त वक्तव्य “छत्रपती शिवराय जुन्या काळातले आदर्श नितीन गडकरी आत्ताचे”