Sushma Andhare: "भाजपने एकनाथ शिंदेंचा ऐकनाथ शिंदे करून टाकला आहे"

धरणगाव येथील सभेत सुषमा अंधारे यांचा घणाघात
Sushma Andhare Criticized Eknath Shinde and BJP in Dharangao Rally
Sushma Andhare Criticized Eknath Shinde and BJP in Dharangao Rally

भाजपने आणि देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचा ऐकनाथ शिंदे करून टाकला आहे. त्यांना आपण काहीही बोलून फायदा नाही. कारण भाजपने त्यांना फक्त आम्ही सांगू ते ऐकायचं हेच ठरवून दिलं आहे अशी घणाघाती टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी धरणगावातल्या सभेत केली. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना फक्त ऐकायचं काम दिलं आहे. कुठला निर्णय घ्यायचा आणि कुठला नाही याची सगळी सूत्रं देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

मी काय सांगते आहे ते नीट समजून घ्या. महाप्रबोधनच्या वाशीतल्या सभेतच मी म्हटलं होतं. माझ्या भावासमोरचा माईक तुम्ही खेचून घेता. माझ्या भावाला तुम्ही कागद देता. माझा भाऊ (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) कॉपी करून पास झालेला नाही. असं असताना तुम्ही त्यांना कॉप्या कशाला पुरवता? मी जेव्हा हे बोलले तेव्हा काही लोक हसले. पण दादाहो हा टिंगल करण्याचा विषय नाही. ज्याअर्थी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वारंवार असा अपमान करतात, वारंवार माईक काढून घेतात, गिरीश महाजनांसारखी सुमार बुद्ध्यांक असलेली मंडळी जेव्हा त्यांना समजावू पाहतात तेव्हा त्याचा अर्थ साधा नसतो. ही गोष्ट भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे लोक जाणीवपूर्वक करत आहेत.

मराठा मुख्यमंत्र्याला बुद्ध्यांक नाही हे भाजप ठसवू पाहतं आहे

मराठा मुख्यमंत्र्याला बुद्ध्यांकच नाही हे भाजप ठसवू पाहतं आहे. तुमच्या सांगण्याप्रमाणे आणि चंद्रकांत पाटील यांनी उल्लेख केला तसा मनावर दगड ठेवून आम्ही मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला पण त्याला बुद्ध्यांकच नाही हे ठसवण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने केला जातो आहे असाही गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात केला. मराठा समुदायाकडे नेतृत्वाची क्षमता नाही असं या सगळ्यातून ठसवलं जातं आहे. लोकांवर बिंबवण्यासाठी कागद देणं, माईक काढून घेणं हे प्रकार केले जातात. तुम्ही काहीही प्रश्न विचारला तरी मुख्यमंत्री म्हणतात उपमुख्यमंत्र्यांना विचारून सांगतो.

मुख्यमंत्र्यांचा अर्ध्याहून अधिक वेळ दिल्लीत

मुख्यमंत्र्यांचा अर्ध्याहून अधिक वेळ दिल्लीत जातो. उपमुख्यमंत्र्या प्रश्न विचारून उपयोग नाही. कारण त्यांना प्रश्न विचारला की लगेच त्यांच्यावर केसेस आणि धाकदपटशा सुरू केला जातो. आमचे संजय राऊत म्हणाले की मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही त्यांना तुरुंगात धाडण्यात आलं. अनिल परब म्हणाले काय करायचं ते करा लगेच त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला.

मुंबईतला राणेंचा अधीश बंगला कधी पाडणार?

किरीट सोमय्या अनिल परब यांचं रिसोर्ट पाडायला कोकणात निघाले. मी त्यांना सांगू इच्छिते की कोकण खूप लांब आहे त्याआधी तुम्ही मुंबईत असलेला नारायण राणेंचा बंगला पाडून दाखवा. त्याबाबत तुम्ही गप्प का? असाही प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in