Sushma Andhare: उद्धव ठाकरेंची भेट झाली असती, तर...; आप्पासाहेब जाधवांचे गंभीर आरोप - Mumbai Tak - sushma andhare vs appasaheb jadhav controversy in shiv sena ubt jadhav allegations on andhare - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Sushma Andhare: उद्धव ठाकरेंची भेट झाली असती, तर…; आप्पासाहेब जाधवांचे गंभीर आरोप

शिवसेनेतून बडतर्फ करण्यात आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पैसे मागितल्याचा आरोप केला आहे.
Updated At: May 19, 2023 15:49 PM
Shiv Sena UBT Sushma Andhare vs Appasaheb Jadhav : Jadhav, who was dismissed from the Shiv Sena, has accused Andhare of asking for money.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे आणि बीडचे बडतर्फ करण्यात आलेले जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात चांगलाच वाद झाला. जाधव यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे त्यांनी सुषमा अंधारेंना चापट मारली. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि आप्पासाहेब जाधव यांचं म्हणणं काय आहे, याबद्दल मुंबई Tak ने जाधव यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितलं.

मुंबई Takशी बोलताना आप्पासाहेब जाधव म्हणाले, “जिल्ह्यातील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांकडे सुषमा अंधारे यांनी पैसे मागितले. हा प्रकार पाच दिवसांपासून सुरू झाला. आधीही होता, पण मर्यादित होता. काही कार्यकर्ते डिझेल भरून द्यायचे. पण, आता 20 मे रोजी बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा आहे. त्या यात्रेसाठी संजय राऊत येणार आहेत. नांदेडहून परळीत येणार आहे आणि सुषमा अंधारे यांच्या घरी जाणार आहेत. त्यांच्या घरी बसण्याची सोय नाही म्हणून त्यांनी घराशेजारी शेड आहे. त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून एसी घेतली, फर्निचर घेतलं. सोफे घेतले. काहीजणांकडे रोख पैसे मागितले.”

उद्धव ठाकरेंची भेटीसाठी वेळ मागितली

“सुषमा अंधारेंनी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांनी या गोष्टी सुरू केल्या. मी वरिष्ठांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. परवा दिवशी (17 मे) आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितला. मी चार वेळा कॉल केला आणि त्यांचा वेळ घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पीए म्हात्रे यांनी फोन घेतला आणि सांगितलं की थोड्या वेळाने सांगतो. नंतर त्यांना कॉल्स केले पण त्यांनी घेतले नाही.”

हेही वाचा >> ‘सुषमा अंधारेंना दोन चापटा लगावल्या’, ठाकरे गटात वादाची ठिणगी; काय घडलं?

“माझी उद्धव ठाकरेंसोबत काल (18 मे) भेट झाली असती, तर हा प्रकार घडलाच नसता. मी संपर्कप्रमुखांना, वरिष्ठांना सांगितलं. त्यांनीही उद्धव ठाकरेंची वेळ घेऊन त्यांना सांगितलं पाहिजे. पण, परिस्थिती अचानक उद्भवली.”

हा कुणाचा कट नाहीये

हे आरोप शिवसेनेचा (शिंदे गट) कट असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. यावर आप्पासाहेब जाधव म्हणाले की, “हा कुणाचा कट नाहीये. आमची 20 तारखेला सभा होणार आहे. आम्ही दोन्ही जिल्हाप्रमुखांनी शहरात 300 बॅनर लावले आहेत. जर आम्हाला कट करायचा असता, तर मी इतके बॅनर कशाला लावले असते. स्टेजवर पैसे खर्च झाले. दोन्ही जिल्हाप्रमुखांचे 50-50 टक्के पैसे खर्च होणार होते. असं असतं तर आम्ही खर्चच केला नसता”, असा खुलासा आप्पासाहेब जाधव यांनी केला.

हेही वाचा >> ‘शिल्लक सेनेच्या 8 याचिका अन् पोपट मेलाय’, देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

“माझी हकालपट्टी झाली, असली तरी आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. आम्ही त्यांना सांगितलं नाही की, सभेला जाऊ नका. ते पॉम्पलेट वाटण्याचं काम करत आहेत. मी जिल्हाप्रमुख असल्यामुळे सगळ्या गोष्टी मीच करत होतो. मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातच आहे. मी कुठल्याही पक्षात आणि गटात जाण्याचा विचार केलेला नाही”, असं जाधव यांनी सांगितलं.

Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात चिकन खा अन् Weight Loss करा! कमी वयात IAS-IPS झालेल्या 5 तरुणांची प्रेरणादायी कहाणी स्वत:साठी फक्त 5 मिनिटे काढा अन् दिवसाची सुरूवात ‘या’ 8 योगा स्टेप्सने करा! झटपट Weight Loss करायचंय? मग ‘हे’ 8 Snacks खाऊनच बघा… ‘गाव की गोरी बनली, शहर की छोरी’; अभिनेत्रीने केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन अभिनेत्रीचा फुल ऑन फायर हॉट फिगर; कारण फॉलो करते ‘हा’ Diet Plan 162 किलोच्या IT इंजिनिअरने घटवलं 65 किलो वजन; कोणता सीक्रेट डाएट केला फॉलो? Weight Loss करताय? मग, वर्कआउटनंतर ‘हा’ डाएट करा फॉलो या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण?