Big Breaking: 9 जणांना अपात्र ठरवण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलंय: जयंत पाटील

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Politics Update: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा गौप्यस्फोट झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातत्याने खलबतं सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची पक्ष कार्यालयात पक्षातील काही नेत्यांसोबत चर्चा सुरू होती. ज्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपसोबत गेलेल्या अजित पवार किंवा कोणावरही आपण टीका करणार नाही. अजितदादांसोबत मी कधीही वाद घातला नाही आणि घालणार असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असे म्हणाले की, 9 जणांना अपात्र ठरवण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलं आहे. (swearing in ajit pawar upheaval in ncp supriya sule press conference big statement about ajitdada sharad pawar maharashtra politics update today)

जयंत पाटलांनी केली मोठी घोषणा

ज्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यां सर्वांना अपात्र ठरवण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलं आहे. असं जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवं राजकारण पाहायला मिळणार आहे. 

पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

‘संघर्ष कसा करायचा किंवा त्याचं संधीत कसं रुपांतर करायचं हे पवार साहेबांनी सांगितलं आहे. कितीही संघर्ष करायची वेळ आली तर साताऱ्याची सभा.. आणि आज पवार साहेबांनी पत्रकारांना दिलेलं उत्तर मला वाटतं कोणालाही उर्जा देणारं आहे. माझ्या स्वत:साठी अर्थातच संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. त्यातून नाउमेद होण्याचा एक मार्ग असतो आणि दुसरा मार्ग असतो की, ठीक आहे.. हा प्रश्न आलेला आहे आपल्याला त्यातून नव्या उर्जेने.. नवा मार्ग काढू.. ही घटना वेदना देणारी आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘2019 ते 2023 म्हणजे 4 वर्ष झाली.. चार वर्षात थोडीशी जबाबदारी माझ्यावर पण आली आहे. मला असं वाटतं की, तेवढी राजकीय प्रगल्भता माझ्यात देखील आली आहे. की आपलं व्यावसायिक काम आणि आपली नाती यात गल्लत करायची नाही. त्यामुळे माझ्या मनात दादा हा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहील. माझ्या मनात दादाबद्दल प्रेमच राहील.’

‘एक तर वैयक्तिक दादा आणि माझ्यात वाद होऊच शकत नाही.. कारण की मी वाद कधी घालणारच नाही.. दादा हा माझा मोठा भाऊ आहे.. त्यामुळे अर्थातच दादाशी मी कुठल्या विषयावर कधी इतक्या वर्षात वाद घातला नाही.. कधी घालणारही नाही. जेव्हा दादा आणि माझं नातं येतं.’

ADVERTISEMENT

‘जेव्हा पक्षाबाबत येतं तेव्हा ते प्रोफेशनल असतं आणि हे आमचं वैयक्तिक नातं आहे. मी माझं पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य यात आता गल्लत करत नाही. नाती नात्यांच्या जागी आणि कामाच्या जबाबदाऱ्या त्यांच्या जागेवर.. काहीही झालं तरी आमचं कौटुंबिक नातं कायम राहील.’ असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

ADVERTISEMENT

शपथ घेतल्यानंतर अजित पवार नेमकं काय म्हणालेले?

‘काही जणं आता वेगवेगळी टीका-टिप्पणी करणार आम्हाला टिका-टिप्पणीला फार उत्तर देण्याचं कारण नाही. आपण कामाशी मतलब ठेवत असतो. केंद्रीय निधी महाराष्ट्राला मिळेल हे पाहणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यासाठी हा निर्णय घेतला. हा निर्णय जवळपास बहुतेक आमदारांना मान्य आहे. लोकप्रतिनिधींना मान्य आहे. पक्ष सगळा आमच्यासोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. कुठल्याही निवडणुका असतील जे पक्षाचं चिन्ह आहे, नाव आहे.. त्याच नावाखाली.. चिन्हाखाली आम्ही निवडणूक लढवणार.’

‘नागालँडला निवडणुका झाल्या होत्या.. तिथे जे राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले ते सगळे भाजपसोबत गेले. दुसरी गोष्ट काही जण त्या ठिकाणी वेगवेगळे आरोप त्या ठिकाणी करतील.. वास्तविक आम्ही साडेतीन वर्षांपूर्वी जो निर्णय घेतलेला होता त्याही वेळेस शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तिघांचं सरकार होतं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..’

‘त्यामध्ये जातीयवादी म्हणण्याचा अधिकार.. जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर आम्ही भारतीय जनता पक्षासोबत देखील जाऊ शकतो. त्यामुळे तिथे कुठलीही अडचण नाही.. नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो. तर राज्याच्या विकासाकरिता आम्ही जाऊ शकतो.’ असं अजित पवार म्हणाले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT