Baba Siddique: शाहरुख-सलमानचे भांडण मिटवलं आता अजितदादांसोबत.. कोण आहेत बाबा सिद्दीकी?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

There are News of Baba Siddique Will leave Maharashtra Mumbai Congress and joint Ajit Pawar Nacp Get Know all About Him
There are News of Baba Siddique Will leave Maharashtra Mumbai Congress and joint Ajit Pawar Nacp Get Know all About Him
social share
google news

Baba Siddique : महाराष्ट्रात काँग्रेसला (Mumbai Congress) आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यानंतर बाबा सिद्दीकीही काँग्रेस सोडणार आहेत अशा चर्चेला उधाण आलं आहे. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) पुढील आठवड्यात राष्ट्रवादीत (अजित पवार गट) (Ajit Pawar NCP) प्रवेश करणार असं म्हटलं जात आहे. बाबा सिद्दीकी आणि त्यांचा आमदार मुलगा जीशान यांनी बुधवारी (31 जानेवारी) रात्री अजित पवार यांची भेट घेतली. तेव्हापासून ही चर्चा सुरू झाली आहे. (There are News of Baba Siddique Will leave Maharashtra Mumbai Congress and joint Ajit Pawar Nacp Get Know all About Him)

दोन्ही पिता-पुत्रांनी अजित पवारांशी त्यांच्या पुढील रणनीतीवर चर्चा केल्याचं बोललं जातंय. बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जातात. यापूर्वी ते वांद्रे येथून तीन वेळा आमदार राहिले आहेत. बाबा सिद्दीकी सत्ताधारी आघाडीत सहभागी झाल्यास महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापू शकते, असे मानले जात आहे.

वाचा : Baba Siddique : मुंबईत काँग्रेसला दुसरा झटका बसणार! माजी मंत्री अजित पवारांच्या गळाला

बाबा सिद्दीकींनंतर अजित पवार गटात मुस्लिम चेहऱ्याचा शोध होणार पूर्ण?

याआधी डिसेंबरमध्ये अजित पवार यांनी नवाब मलिक यांना आपल्या गटात सामील करण्याची तयारी केली होती, मात्र भाजपच्या, विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आक्षेपानंतर अजित पवार गटाला आपल्या निर्णयापासून माघार घ्यावी लागली. नवाब मलिक काही महिन्यांपूर्वीच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगातून जामिनावर बाहेर आले आहेत. यामुळे फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना आपल्या गटात समाविष्ट करू नये, अशी विनंती केली. फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक यांना केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाला आहे, त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. यावेळी फडणवीसांच्या विरोधानंतर अजित पवारांनी विचार बदलला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अजित पवार गटात बाब सिद्दीकींना स्थान मिळणार का?

अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबईसाठी मजबूत मुस्लिम चेहरा हवा होता, असे सूत्रांचे म्हणणे आहे. नवाब मलिक यांच्या प्रवेशाला विरोध आल्याने अजित पवार गटाने नव्या चेहऱ्याचा शोध सुरू ठेवला असून आता हा शोध बाबा सिद्दिकीच्या रूपाने पूर्ण होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. बाबा सिद्दीकी यांचा बॉलिवूड स्टार्समध्ये जितका प्रभाव आहे तितकाच प्रभाव त्यांच्या क्षेत्रातील लोकांमध्ये आहे.

वाचा : Maha Vikas Aghadi : संभाजीराजेंनी ‘मविआ’ची लोकसभेसाठीची ‘ती’ ऑफर धुडकावली!

दरवर्षी ते रमजानच्या मुहूर्तावर मुंबईत मोठी इफ्तार पार्टी करतात आणि बॉलीवूड स्टार सलमान खान, शाहरुख खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी त्यात सहभागी होतात. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सध्या मुंबईच्या वांद्रे मतदारसंघातून आमदार आहे आणि मुंबई युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे.

ADVERTISEMENT

बाबा सिद्दीकी ईडीच्या रडारवर!

बाबा सिद्दीकी 2017 पासून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) रडारवर आहेत. मे 2017 मध्ये, कथित झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या इतर ठिकाणी तपास घेतला होता. मनी लाँड्रिंग प्रकरणात, ईडीने 2018 मध्ये त्यांची सुमारे 462 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

ADVERTISEMENT

ईडीच्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे येथील जमात-ए-जमुरियत झोपडपट्टीच्या पुनर्वसन प्रकल्पात गैरव्यवहार केल्याचे आरोप समोर आले होते. 108 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई केली होती. 2012 मध्ये मुंबईतील स्थानिक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंग अंतर्गत तपास सुरू केला होता.

बाबा सिद्दीकी कोण आहेत?

बाबा झियाउद्दीन सिद्दीकी हे बिहारमधील पाटणा येथील रहिवासी असले तरी मुंबईतील राजकारणात त्यांचं दमदार व्यक्तीमत्व आहे. बाबा सिद्दीकी यांची पत्नी शाहजीन गृहिणी आहे. तर त्यांची मुलगी अर्शिया सिद्दीकी डॉक्टर आहे. बाबा सिद्दीकी हे मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात. वांद्रे पश्चिमेच्या जागेवर त्यांचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. तिथून ते तीनवेळा आमदार झाले आहेत. याशिवाय ते अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्रीही राहिले आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबई विभागाचे ते अध्यक्षही राहिले आहेत.

वाचा : मॉडेल Poonam Pandey चे निधन; समोर आले मृत्यूचे कारण!

बाबा सिद्दीकी यांचा 2014 मध्ये आशीष शेलारांकडून पराभव

बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी नेता म्हणून केली. ते पहिल्यांदाच मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे ते 1999, 2004 आणि 2009 मध्ये वांद्रे मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून बाबा सिद्दीकींचा पराभव झाला होता.

बाबा सिद्दीकींचं बॉलिवूड कनेक्शन

बाबा सिद्दीकी यांचे वडील वांद्रे येथे घड्याळ बनवण्याचे काम करायचे. ते ही वडिलांना या कामात मदत करायचे. शिक्षणादरम्यान बाबांना राजकारणाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी राजकारणात एवढी धमक निर्माण केली की बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टार्सही त्यांना मानायला लागले. त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या इफ्तार पार्टीत वर्षानुवर्षे असलेलं वैरही संपुष्टात येते. सलमान आणि शाहरुखमध्ये कधीकाळी निर्माण झालेला दुरावा सर्वांनाच माहित आहे. 2014 मध्ये दोघेही बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला आले आणि गळा भेट करून त्यांच्यातील वाद मिटवला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT