उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादात; शिंदे – ठाकरे गटाचे आरोप-प्रत्यारोप
औरंगाबाद : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (रविवारी) औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या औरंगाबादमध्ये गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार व पेंढापूर येथे पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी केली. जे सुरु आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्हीं […]
ADVERTISEMENT

औरंगाबाद : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (रविवारी) औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या औरंगाबादमध्ये गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार व पेंढापूर येथे पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी केली.
जे सुरु आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्हीं काळजी करू नका, धीर सोडू नका. मी सोबत आहे.
– शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेशिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या संभाजीनगर गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार व पेंढापूर येथे पाहणी केली. pic.twitter.com/AxbVmFmY8e
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 23, 2022
मात्र ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन आरोप-प्रत्यारोप आणि टीका-प्रत्यूत्तराचे राजकारण सुरु झाले आहे. ठाकरेंच्या या दौऱ्यावर बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने जोरदार टीका केली. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते आणि मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दूल सत्तार, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केवळ २ तासांच्या दौऱ्यात ठाकरेंना शेतकऱ्यांच्या काय व्यथा समजणार असा प्रश्न केला आहे.
मुख्यमंत्री असताना तासनतास बसले बांद्र्यावर, पद गेल्यावर 15 मिनिट शेतकऱ्यांच्या बांधावर, अशी उपहासात्मक टीका प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली. तर अडीच वर्षात उद्धव ठाकरे पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बांधावर येत आहेत, चांगलं आहे. पण काही मिनिटांच्या दौऱ्यात त्यांना काय कळेल, परतीचा पाऊस जसा जाणार तसा हा मान्सून मातोश्रीवर परतणार, पण तरीही त्यांनी काही सुचना केल्या तर नक्कीच विचार करू, असं अब्दूल सत्तार म्हणाले.
मुख्यमंत्री असताना तासनतास बसले बांद्र्यावर
पद गेल्यावर आता 15 मिनिट शेतकऱ्यांच्या बांधावर … https://t.co/yj7gDhtbyT
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) October 23, 2022
दरम्यान, उदय सामंत यांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका करताना एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी तुमचे शेतकऱ्यांच्या बांधावरचे दौरे नक्की कसे असतात हे आमच्यापेक्षा जास्त कुणाला माहिती नसेल, असे सांगत शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांचा आढावा सांगितला आहे.