Uddhav Thackeray : “…अरे पण कुणाच्या दारी?”, शिंदेंवर घणाघात, भाजपला सुनावले
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राज्यात अवकाळी पाऊस झाला आहे, पण मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, ते दुसऱ्या राज्यात फिरताहेत, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर टीकेचे बाण डागले.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray on Eknath Shinde : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रचार दौऱ्यांवरून घेरलं. तिकडे विश्वगुरू (नरेंद्र मोदी) आलेले असताना हे (एकनाथ शिंदे) जाऊन काय दिवे लावणार आहेत?, असा सवाल करत ठाकरेंनी शिंदेंबरोबरच भाजपलाही सुनावलं.
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थिती आणि सरकारच्या कामाच्या पद्धतीवर बोट ठेवलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “हे स्वतःची खुर्ची सांभाळण्यासाठी दिल्लीवाऱ्या करताहेत. जरा यांच्यावर काही बोललं की हे गद्दार गळा काढताहेत की गरीब शेतकऱ्याचा मुलगा… शेतीबद्दल आदर आहे, पण गरीब शेतकऱ्याची पंचतारांकित शेती, ज्या शेतीमध्ये हे हेलिकॉप्टरने जातात. मी तर म्हणतो अशी शेती, असं वैभव माझ्या साध्या आणि छोट्या शेतकऱ्यांनाही लाभो अशी मी प्रार्थना करतो”, असं ठाकरे म्हणाले.
तिकडे जाऊन गळा काढतात
“कुणाचंही शेत असं पंचतारांकित नसेल. शेतकरी बिचारा पायवाट तुडवत जातो. तो रात्री पाणी द्यायला जातो. त्याला सर्पदंश होतो, विंचू चावतो, असं या पंचतारांकित शेतीत होतं नाही. पण, तिकडे जाऊन गळा काढतात”, असा टोला ठाकरेंनी शिंदेंना लगावला.