Maharashtra Politics : राज ठाकरेंसोबत युती… उद्धव ठाकरेंनी विषयच संपवला

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

uddhav Thackeray, chief of shiv sena UBT said he will not be alliance with raj thackeray's MNS
uddhav Thackeray, chief of shiv sena UBT said he will not be alliance with raj thackeray's MNS
social share
google news

Uddhav Thackeray-Raj Thackeray Alliance : अजित पवारांनी बंड केले. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली ती राजकारणाचा उबग आल्याची. अशातच काही ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स झळकले ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याचे. मधल्या काळात दोघांनी एकत्र यावे, अशी मागणी जोर धरू लागली. पण, ती चर्चा मध्येच थांबली. मात्र उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का, हा प्रश्न अनुत्तरितच होता. हा प्रश्न निकाली काढलाय उद्धव ठाकरे यांनी. उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युती करण्याबद्दल काय बोलले? (No Alliance with raj Thackeray said uddhav Thackeray in his latest interview)

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून मागे एकदा प्रयत्न झाला होता. त्याचा उल्लेख राज ठाकरेंनी काही मुलाखतींमध्येही केलेला आहे. पण, दोन्ही भाऊ आजपर्यंत एकत्र आलेच नाहीत. आता राज्यात झालेल्या उलथापालथीनंतर राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याची मागणी होत आहे. याचबद्दल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला आणि ठाकरेंनी त्याला स्पष्ट उत्तर दिलंय.

महाराष्ट्रात पुतण्यांचं राजकारण

संजय राऊत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारताना म्हणाले, ‘महाराष्ट्राचं राजकारण हे गेल्या काही काळापासून मुलांच्या भोवती नव्हे तर पुतण्यांच्या भोवती फिरताना दिसतं.’ त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कोणता पक्ष त्याला अपवाद आहे?’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंनी उलट प्रश्न केल्यानंतर संजय राऊत म्हणाले, ‘आणि पुतण्यांमुळे अनेक पक्ष अडचणीत आलेत असं वाटत नाही का? राष्ट्रवादीतच दोन पुतणे आहेत. मुंडय़ांचे पुतणे असतील किंवा शरद पवारांचे…’

वाचा >> शरद पवारांचं वय झालं, रिटायर्ड व्हायला पाहिजे का? उद्धव ठाकरें म्हणतात…

त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘हो… पण आता हे सगळे पुतणे गेलेत कुठे? आता सगळे पुतणे कोण गोळा करतंय… हे पुतण्यांचं तण… हे आता सगळे कोणाच्या पारडय़ात पडले? जे घराणेशाहीला विरोध करत आहेत ते घराणी फोडूनच त्यांना घेताहेत ना..?’

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार?

पुतण्यासंदर्भातील प्रश्नाला धरूनच संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंकडे पुढचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, ‘त्यातले एक पुतणे तुमचे भाऊच आहेत आणि मधल्या काळात एक चर्चा सतत सुरू होती की दोन भाऊ एकत्र येतील का? त्यावर कोणाकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही. या चर्चेला कुठे आधार आहे का?’

ADVERTISEMENT

वाचा >> Pune Crime News : महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार! सावकाराचं भयंकर कृत्य

ठाकरे बंधू एकत्र येणार का, या प्रश्नाभोवती सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आधार असता तर चर्चा थांबलीच नसती ना… आपणच म्हणालात चर्चा झाली आणि चर्चा थांबली… ज्याने कोणी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असेल, त्याला आधार मिळाला नाही म्हणून चर्चा थांबली असेल.’

संजय राऊतांनी हा मुद्दा पुन्हा पुढे नेला आणि विचारलं की, ‘पण असा एखादा चर्चेचा प्रस्ताव आला तर काय कराल?’

वाचा >> Raj Thackeray : ‘हे नितीन गडकरींचं अपयश, महाराष्ट्राचं दुर्दैव’, राज ठाकरे का भडकले?

या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, ‘मी आला तर… गेला तर… याच्यावर कधी विचार करत नाही. गेला तरी विचार करत नाही आणि आला तरी त्यावर विचार करत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा विचार करतो मी. त्याच्यामुळे आता तरी अशी काही चर्चा नाही. त्यामुळे असं बोलण्याचीही काही आवश्यकता नाही’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विषय संपवला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT