Maharashtra BJP : “ठाकरे, राऊत आता तरी शहाणे व्हा, हा तमाशा बंद करा”
Mla Disqualification verdict : राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Mla Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर निकाल दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवत नार्वेकरांनी शिंदे गट हाच मूळ शिवसेना असल्याचे निकालात स्पष्ट केले. या निकालानंतर प्रतिक्रिया उमटत आहेत. या निकालावर उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह विरोधकांनी टीका केली. उद्धव ठाकरे-संजय राऊतांनी नार्वेकरांवरच निशाणा साधल्यानंतर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
” आता तरी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी बिन पैशाचा तमाशा थांबवावा”, असे म्हणत महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी निशाणा साधला आहे.
रडारडी बंद करा; भाजपचा टोला
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला. या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, “लोकशाहीची हत्या, काळा दिवस, गद्दारी, संगनमत, नियम धाब्यावर बसवले, दिल्लीवरून लिहिलेली स्क्रिप्ट, हुकूमशाही ह्या बाराखडीची रडारडी बंद करावी.”
“सर्व निर्णय हे घटनेच्या चौकटीत घेतले जातात. सरकार परत आणा म्हणणारे सर्वोच्च न्यायालयात तोंडावर आपटले, कोण तर उद्धव ठाकरे… अहंकारात हिंदुत्व सोडलं, आमदार-खासदार आणि कार्यकर्ते गमावले, कुणी तर उद्धव ठाकरे यांनी”, असे म्हणत उपाध्ये यांनी ठाकरेंना सुनावलं आहे.