उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसमोर खरोखरच पत्करली राजकीय शरणागती?

साहिल जोशी

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray come in the mode of 'complete political surrender' to Sharad Pawar
Uddhav Thackeray come in the mode of 'complete political surrender' to Sharad Pawar
social share
google news

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरीच मोठी उलथापालथ होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे राज्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. त्याचं झालयं असं की, 2024 मध्ये विरोधी ऐक्याचे मॉडेल म्हणून समोर आलेली महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) चहुबाजूंनी अडचणीत सापडलेली दिसत आहे आणि या संपूर्ण राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार. (Uddhav Thackeray come in the mode of ‘complete political surrender’ to Sharad Pawar)

शरद पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री पदासाठी बंड करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. अशात महाविकास आघाडीबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांची राजकीय भूमिकाही बदलताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तुटण्यापासून वाचविण्यासाठी शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिंदे-भाजपमुळे राज्याची सत्ता आणि पक्ष गमावलेले उद्धव ठाकरे आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी सध्याच्या घडीला पवार कुटुंबाला सारी ‘राजकीय सत्ता’ देण्यास तयार झाल्याचं दिसत आहे. मात्र यामुळे उद्धव ठाकरे पवारांपुढे ‘संपूर्ण शरणागती’ च्या मुद्रेत आले आहेत का? असा सवाल विचारला जात आहे.

पवार घराण्याचा पॉवर गेम

खरंतर, अजित पवार अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगून आहेत आणि त्यांच्या याच इच्छेला भाजपकडून हवा मिळत असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, या खटल्याचा निकाल कधीही येण्याची शक्यता आहे. हा निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेल्यास आणि आमदारांचे सदस्यत्व रद्द झाल्यास शिंदे-भाजप सरकार अल्पमतात येईल, असं सांगितलं जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का.. मुख्यमंत्री बदलणार?, शरद पवार म्हणाले; मला…

यामुळे उद्धव ठाकरे राज्यात मुदतपूर्व निवडणुकीवर भाष्य करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपनेही राजकीय डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्यामुळे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र राहणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

अजित पवारांच्या बंडखोरीच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही, ही गोष्ट शरद पवार ठामपणे सांगत आहेत.  पण त्याचवेळी महाविकास आघाडीच्या भवितव्यावर स्वतः शरद पवारच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पवारांनी रविवारी दिलेले एक विधान खूप चर्चेत आहे, त्यात त्यांनी म्हटले की, कोणाला काहीही करायचे असले तरी ते करण्यापासून किंवा कोणताही निर्णय घेण्यापासून आपण रोखू शकत नाहीत. यासोबतच पवारांचे आणखी एक विधान चर्चेत आहे, त्यात त्यांनी महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांसोबत निवडणुकीच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. तसेच कोण, किती जागांवर निवडणूक लढवणार यावरही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्याबाबत राजकीय अंदाज बांधला जात आहे.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे पवारांना शरण आले?

इंडिया टुडेला मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना एक प्रस्ताव दिला आहे. यानुसार सध्या ते महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांना मुख्यमंत्री बनवायचे असेल तर उद्धव ठाकरे त्यासाठीही तयार आहेत. कारण पक्ष मजबूत करणे आणि शिंदे-भाजपचा पराभव करणे ठाकरेंचे सध्याच्या परिस्थितीतील प्राधान्य आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : मुख्यमंत्री तीन दिवस सुट्टीवर? एकनाथ शिंदे म्हणाले, मी तर…

यावेळी उद्धव ठाकरे यांनी, प्रत्येक पक्षाची वेगवेगळ्या भागातील ताकद लक्षात घेऊन जागा वाटप कराव्यात, असेही पवारांना सांगितल्याची माहिती आहे. तसंच निवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती काहीही असू शकते, असा सुचक इशाराही त्यांनी पवारांना दिला आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीला आवश्यक संख्याबळ मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्याची ठाकरेंनी तयारी दाखविली आहे. काँग्रेसची याबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही, मात्र उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीची ही भीती दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. मात्र एकूणचं महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असतानाही ते मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडण्यास तयार आहेत.

उद्धव ठाकरे यांची राजकीय अडचण?

उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे शरद पवारांसमोर सर्व प्रकारची तडजोड करण्याचे मान्य केले आहे, तो एक प्रकारे त्यांनी अत्यंत विचारपूर्वक टाकलेला डाव असल्याचं सांगितलं जात आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सहकार्याने केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राची सत्ता तर गमवावी लागलीच, पण शिवसेना पक्षही त्यांच्या हातातून गेला आहे. शिवसेनेचे नाव, चिन्ह, दोन तृतीयांश आमदार आणि निम्म्याहून अधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपेक्षा आपले राजकीय अस्तित्व वाचविण्याचे आणि भाजप-शिंदेंनी दिलेल्या राजकीय जखमांचा हिशोब चुकता करण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.

हे ही वाचा : ‘औरंगाबाद,उस्मानाबादची नावं बदलणारे लोकं क्षुद्र’, भालचंद्र नेमाडे संतापले!

महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र राहिल्यावरच भाजप-शिंदे गट युतीला तगडे आव्हान देऊ शकतात, हेही उद्धव ठाकरे यांना माहीत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादीची मजबूत पकड आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाल्यास भाजप-शिंदे गटाचा पराभव करणे उद्धव ठाकरेंना सोपे जाणार नाही. याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे एकमेव नेते आहेत जे राजकीय डावपेचांमध्ये भाजपचा पराभव करू शकतात. काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे शरद पवार यांच्या उंचीचा नेता नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसमोर ‘संपूर्ण समर्पणाची’ तयारी दर्शवली आहे.

महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व

उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त लोकसभेच्या जागा असलेले राज्य आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत, त्यामुळे या जागा राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाच्या आहेत. 2019 मध्ये भाजपने 23 खासदार, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस एक, एआयएमआयएम एक आणि अपक्ष एक खासदार जिंकण्यात यश मिळविले. भाजप आणि शिवसेना एकमेकांचे विरोधक बनले आहेत. अशा स्थितीत 2024 च्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा काबीज करायच्या आहेत, मात्र महाविकास आघाडीत तीन पक्ष असल्याने शिंदे यांना सोबत घेण्याचा भाजपचा डाव यशस्वी होताना दिसत नाही.

महाराष्ट्रात शिंदेंना सोबत घेण्याचा भाजपचा डाव यशस्वी होताना दिसत नाही, असे आजतकच्या मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना (उद्धव गट) यांना लोकसभेच्या 34 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर भाजप-शिंदेंना केवळ 14 जागा मिळतील असा अंदाज आहेत. या पाहणीनंतर भाजपने राष्ट्रवादीसाठी फासे टाकण्यास सुरुवात केली. जर यातून शरद पवार वेगळे झाले तर महाविकास आघाडी पुन्हा आपला प्रभाव दाखवू शकणार नाही, हे उद्धव ठाकरे यांनाही कळून चुकले आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे पवारांना कोणत्याही किंमतीत सोबत ठेवू इच्छितात आणि त्यासाठी प्रत्येक अट मान्य करत आहेत का?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT