“हिटलर असाच माजला होता”, उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना दिलं चॅलेंज
मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या एनएससीआय डोम येथे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यव्यापी शिबीर झाले. या शिबिरात बोलताना ठाकरेंनी थेट मोदी-शांहांवरच हल्ला चढवला. मणिपूर हिंसाचारावरून ठाकरेंनी मोदींना आव्हान दिलं.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray today speech : शिवसेनेचे (UBT) नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकेचे बाण डागले. शाह मणिपूरमध्ये गेले, तरी तिथले लोक जुमानत नाहीये. मोदी मणिपूरमध्ये जाण्याऐवजी अमेरिकेला चाललेत’, असं म्हणत ठाकरेंनी मोदींना आव्हान दिलं. हिटलरच्या सत्तेचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी मोदींना लक्ष्य केलं.
मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या एनएससीआय डोम येथे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यव्यापी शिबीर झाले. या शिबिरात बोलताना ठाकरेंनी थेट मोदी-शांहांवरच हल्ला चढवला. मणिपूर हिंसाचारावरून ठाकरेंनी मोदींना आव्हान दिलं. त्याचबरोबर इतर मुद्द्यांवरून भाजपला टोला लगावला.
उद्धव ठाकरे मोदी-शाहांबद्दल काय बोलले?
भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, “बाळासाहेबांचे दूत जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत कितीही शाह आणि अफजलखान आले तरी मला परवा नाही. तेव्हा मी म्हटलं होतं की, अफजल खानाची फौज येतेय. लोक म्हणाले काय बोलता आहात. आता कळलं ना तुम्हाला अफजल खानाची फौज.”
हेही वाचा >> Uddhav Thackeray : “देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हलाखीची!”, फडणवीसांना डिवचलं
“एवढीच जर तुम्हाला मस्ती दाखवायची असेल, तर मणिपूरमध्ये दाखवा. ईडी, सीबीआय तिकडे पाठवा. लोक जाळून टाकतील. अगदी अमित शाहांनाही जुमानत नाहीये. मोदी आता अमेरिकेत चाललेत, पण मणिपूरमध्ये जायला तयार नाहीये. विश्वगुरू अमेरिकेत जाऊन विकत घेतलेल्या लोकांसमोर ज्ञान पाजळणार आहेत. माझ्या देशातील एक भाग पेटलेला आहे. रशिया-युक्रेनचं युद्ध थांबवल्याची भाकड कथा सांगितली. ही कथा सत्य करायची असेल, तर मणिपूरमध्ये जा. आधी तर मोदींनी मणिपूरमध्ये फक्त जाऊन दाखवावं. लोक ऐकतात का बघू”, असं आव्हान ठाकरेंनी मोदींना दिलं.