Jogendra kawade : हाजी मस्तानसोबत पार्टी काढणारा नेता एकनाथ शिंदेंसोबत
जोगेंद्र कवाडे… (Jogendra kawade) दलित चळवळीतलं एक मोठं नाव! जोगेंद्र कवाडे यांनी एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना आघाडी करत असल्याची घोषणा केली. एकनाथ शिंदेंसोबत आघाडी करणारे जोगेंद्र कवाडे नेमके कोण आहेत? (who is Jogendra kawade) त्यांची राजकीय पार्श्वभूमी आणि आजपर्यंतची कारकीर्द कशी आहे? (Jogendra kawade political biography) याचा घेतलेला हा आढावा… जोगेंद्र […]
ADVERTISEMENT

जोगेंद्र कवाडे… (Jogendra kawade) दलित चळवळीतलं एक मोठं नाव! जोगेंद्र कवाडे यांनी एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना आघाडी करत असल्याची घोषणा केली. एकनाथ शिंदेंसोबत आघाडी करणारे जोगेंद्र कवाडे नेमके कोण आहेत? (who is Jogendra kawade) त्यांची राजकीय पार्श्वभूमी आणि आजपर्यंतची कारकीर्द कशी आहे? (Jogendra kawade political biography) याचा घेतलेला हा आढावा…
जोगेंद्र कवाडे यांचा जन्म 1 एप्रिल 1943 नागपूरला झाला. ते दलित चळवळीतले प्रमुख नेते आहेत. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होते.
1976 पासूनच त्यांनी बौद्ध धर्मीयांच्या सवलतींसाठी आंदोलनं केली. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी त्यांचं आंदोलन सर्वाधिक गाजलं. त्यांनी १९७९ ला हजारो आंबेडकरवादी तरुणांना सोबत घेऊन नागपुरातल्या दीक्षाभूमीवरून ते औरंगाबादपर्यंत लाँगमार्च काढला होता.