Ganpat Gaikwad: ‘हो झाडल्या मी गोळ्या…’, जाहीर कबुली देणारे आमदार गणपत गायकवाड आहेत तरी कोण?
BJP MLA Ganpat Gaikwad: शिवसेना नेत्यावर गोळ्या झाडणारे आणि त्याची जाहीर कबुली देणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याविषयी जाणून घ्या सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

Ganpat Gaikwad Profile: कल्याण: भाजप आमदाराने काल थेट पोलीस ठाण्यातच गोळीबार करत शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला केला. एक नाही, दोन नाही तब्बल सहा गोळ्या त्यांनी झाडल्या. महत्वाचं म्हणजे या गोळ्या भर पोलीस ठाण्यात झाडल्या गेल्या. त्याहूनही महत्वाचं म्हणजे या गोळ्या कुठल्या गुन्हेगारानं नाही तर सलग तीनदा आमदार म्हणून निवडून आलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी झाडल्या. त्यांनी हा गोळीबार का केला?, ज्या भाजप आमदारानं हा गोळीबार केला ते गणपत गायकवाड नक्की कोण? हे सगळं जाणून आपण सविस्तर जाणून घेऊयात. (who is the bjp mla ganpat gaikwad who firing on shiv sena leader mahesh gaikwad know his profile)
कल्याण पूर्वमधील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि नेते महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. हा जीवघेणा हल्ला भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी स्वतः केला आहे. या हल्ल्यात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून, महेश गायकवाड यांचे मित्र आणि शिंदे समर्थक राहुल पाटील हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आता हा गोळीबार का केला गेला तर यावर स्वत: ज्यांनी हा गोळीबार केला ते म्हणजे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘हा गोळीबार मीच केला..’ असं म्हणत त्यांनी यामागचं कारण सांगितलं.
हे ही वाचा>> Ganpat Gaikwad: ‘हा गोळीबार नाही.. शिंदे-फडणवीसांमधील गँगवार’, सुषमा अंधारेंच्या विधानाने खळबळ
गणपत गायकवाड म्हणाले.. “पोलीस ठाण्याच्या दरवाज्यात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेवर या लोकांनी जबरदस्ती कब्जा केला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्या सारख्या साध्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे. मी स्वत: गोळी झाडली. मला काही पश्चात्ताप नाही. कारण माझ्या मुलांना पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर मारत असतील तर मग मी काय करणार?”,अशी पहिली प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली.










