मशिदींवरच्या भोंग्याविरोधात हनुमान चालीसाच का? राज ठाकरेंनीच दिलं उत्तर, म्हणाले….
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर भाषण केलं. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता तो मशिंदीवरचे भोंगे खाली उतरवण्याचा. या भोंग्याचा लोकांना त्रास होतो आणि हा सामाजिक विषय आहे धार्मिक नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंवर टीका झाली. या टीकेला उत्तर देण्यासाठी १२ एप्रिलला राज […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर भाषण केलं. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता तो मशिंदीवरचे भोंगे खाली उतरवण्याचा. या भोंग्याचा लोकांना त्रास होतो आणि हा सामाजिक विषय आहे धार्मिक नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंवर टीका झाली. या टीकेला उत्तर देण्यासाठी १२ एप्रिलला राज ठाकरेंनी उत्तरसभाही घेतली होती.
१२ एप्रिलला ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी सरकारला मशिदींवरच्या भोंग्यांबाबत ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिला. ३ मे रोजी रमजान ईद आहे तोपर्यंत सरकारने भोंगे खाली उतरवावेत नाहीतर आम्हाला त्याविरोधात हनुमान चालीसा पठण करावं लागेल असा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे. रामनवमीच्या दिवशी शिवसेना भवनासमोरही मनसेने हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम केला होता ज्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आव्हान दिलं होतं. मशिदींवरच्या भोंग्याविरोधात हनुमान चालीसाच का? याचं उत्तर आता दस्तुरखुद्द राज ठाकरेंनीच दिलं आहे.