महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात पेशवाईतल्या नाना फडणवीस आणि महादजी शिंदेंची चर्चा का होते आहे?

मुंबई तक

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं आहे त्यामुळे राजकीय भूकंप झाला आहे. सरकार कधीही कोसळू शकतं अशा स्थितीत आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ असे ५१ आमदार आहेत. आपण भाजपसोबत गेलं पाहिजे, अशी या सगळ्यांची भूमिका आहे. हे आव्हान त्यांनी थेट पक्ष नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं आहे त्यामुळे राजकीय भूकंप झाला आहे. सरकार कधीही कोसळू शकतं अशा स्थितीत आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ असे ५१ आमदार आहेत. आपण भाजपसोबत गेलं पाहिजे, अशी या सगळ्यांची भूमिका आहे. हे आव्हान त्यांनी थेट पक्ष नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच एक आवाहन केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी बंडखोर आमदारांना उद्देशून हे म्हटलं आहे की अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही परत या आपण समोरासमोर बसून बोलू, तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवल्या जातील असं एक भावनिक आवाहन केलं आहे. तुमचा कुटुंबप्रमुख म्हणून मला काळजी वाटते असंही त्यांनी म्हटलं आहे. तर शरद पवार यांनीही उद्धव ठाकरेंच्यासोबत आम्ही आहोत असं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात हे सत्तानाट्य सुरू असताना एक फोटो सध्या बंडखोरी केलेल्या आमदारांकडून व्हायरल केला जातो आहे. हा फोटो आहे पेशवाईतला. नाना फडणवीस आणि महादजी शिंदे या दोघांनी एकत्र येऊन २० वर्षे कारभार केला असं या फोटोखाली लिहिण्यात आलं आहे. १७७४ ते १७९४ हा कालखंडही या फोटोत देण्यात आला आहे. हा फोटो शिवसेनेच्या आमदारांकडून सोशल मीडियावर व्हायरल केला जातो आहे. त्यामुळे या फोटोची चांगलीच चर्चा आणि नाना फडणवीस तसंच महादजी शिंदे यांची चर्चाही चांगलीच रंगली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp