प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असं काम केलंय पठ्ठ्यांनी, कर्नाटकला ‘असा’ शिकवलाय धडा!
Maharashtra: लातूर: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या बराच चिघळला आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी सीमाभागाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यापासून येथील दोन्ही राज्यात याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच काल कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील काही वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली. कन्नड नागरिकांच्या या हिंसक कृत्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अशातच अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील उद्वेगजनक आहेत. मात्र, असं असलं […]
ADVERTISEMENT

Maharashtra: लातूर: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या बराच चिघळला आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी सीमाभागाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यापासून येथील दोन्ही राज्यात याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच काल कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील काही वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली. कन्नड नागरिकांच्या या हिंसक कृत्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अशातच अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील उद्वेगजनक आहेत. मात्र, असं असलं तरीही महाराष्ट्रातील नागरिकांनी जो संयम दाखवला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. (workers of various organizations have done work that makes every marathi person proud karnataka has been taught a lesson)
एकीकडे महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात हल्ले होत असले तरी दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांचा आणि त्यांच्या चालकांना चक्क सत्कार केला जातोय. होय… अहिंसक पद्धतीने आपला निषेध व्यक्त करणाऱ्या काही समजदार नागरिकांची सध्या लातूरमध्ये बरीच चर्चा सुरु आहे.
…म्हणून महाराष्ट्र ग्रेट आहे!
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगाव जवळील हिरेबागेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करताना महाराष्ट्र पासिंग असलेल्या सहा वाहनांना लक्ष्य करत दगडफेक केली होती. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास गेले असता त्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.