'तुम्हाला त्याग करावा लागेल..', BJP आमदारांना देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं! - Mumbai Tak - you have to sacrifice for modi devendra fadnavis clearly told bjp mlas ajit pawar shinde fadnavis government maharashtra politics update - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

‘तुम्हाला त्याग करावा लागेल..’, BJP आमदारांना देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भाजप आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी आपल्या सर्व आमदारांची बैठक घेत एक मोठं विधान केलं.
you have to sacrifice for modi devendra fadnavis clearly told bjp mlas ajit pawar shinde fadnavis government maharashtra politics update

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) अतिशय नाट्यमय पद्धतीने अजित पवार (Ajit Pawar) यांची एंट्री झाल्यापासून शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपमधील (BJP) आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. शिंदे गटातील आमदारांची नाराजी ही स्पष्टपणे समोर आली आहे. मात्र, भाजपच्या आमदारांची नाराजी अद्याप तरी समोर आलेली नाही. मात्र, अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजप आमदारांमध्येही धुसफूस असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (7 जुलै) आपल्या सर्व आमदारांची मुंबईत एक बैठक घेतली. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपल्या आमदारांना स्पष्ट शब्दात सांगितलं की, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागेल. (you have to sacrifice for modi devendra fadnavis clearly told bjp mlas ajit pawar shinde fadnavis government maharashtra politics update)

पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:

‘महाविकास आघाडी तुटणं आवश्यक होतं’

‘सध्य राजकीय परिस्थितीत बेरजेचे राजकारण गरजेचं आहे. महाविकास आघाडी तुटणं आपल्यासाठी आवश्यक होतं. त्यांची तीन पक्षांची एकत्रित बेरीज आपल्यासाठी अडचणीची ठरणार होती. त्यामुळे आपल्याला बेरजेचे राजकारण करावे लागले.’ असं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या आमदारांना सांगत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

‘मोदींना पंतप्रधान बनवायचंय, तुम्ही त्यागाची तयारी ठेवा’

‘मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील. येत्या काळात त्यागाची तयारी ठेवा, हे यापूर्वीच सांगितलं होतं. येत्या लोकसभा आणि विधानसभेसाठी झोकून देऊन काम करा. येणारा काळ आपलाच असेल याची खात्री देतो.’ असं म्हणत त्यांनी आपल्या नाराज आमदारांना चुचकारण्याचा देखील प्रयत्न यावेळी केला.

‘विरोधी एकत्र आले तरी फायदा होणार नाही…’

यावेळी देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की, ‘पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा,
मोदी @9 अभियानाला आणखी 10 दिवस मुदतवाढ द्या, ‘संपर्क से समर्थन’ अभियान जोमाने राबवा. पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम खालपर्यंत गेले पाहिजे. तसेच संघटना जोमाने काम करीत असताना लोकप्रतिनिधींना सुद्धा त्याला तितकीच भक्कम साथ द्यावी लागेल. तुमची ताकद एकत्र करावी लागेल. समाजातील विविध स्तरातील लोकांना भेटा. विरोधी कितीही एक आले तरी त्याने फायदा होणार नाही.’ असा सल्लाही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिला.

‘भाजपा पक्ष फोडत नाही, पण…’

‘भाजपा पक्ष फोडत नाही, पण मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुणी येत असेल तर त्यांना सोबत घेण्याला विरोध नाही. मोदींना साथ देण्यासाठी सोबत येणाऱ्यांचे स्वागत करा. मंत्रिमंडळ विस्तारसुद्धा आपण लवकरच करू.’ असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, असं असलं तरी अजित पवारांच्या एंट्रीने अनेक मतदारसंघातील गणितं ही बिघडणार आहेत. अशावेळी भाजप मतदारसंघातील लोकांना कशा पद्धतीने समजवणार हा मोठा प्रश्न आमदारांसमोर आहे. अशावेळी आता भाजपमधील नाराजी समोर येणार की पक्षशिस्तीच्या नावाखाली ती तशीच दडून राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज!