भारतीय संघाला बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी मोठा झटका; दुखापतीमुळे ‘हा’ गोलंदाज संघातून बाहेर

मुंबई तक

बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. शमीच्या खांद्याला ही दुखापत झाली होती. बीसीसीआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बांगलादेश दौऱ्यावर भारताला तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. एकदिवसीय मालिका ४ डिसेंबरपासून म्हणजेच रविवारपासून सुरू होत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. शमीच्या खांद्याला ही दुखापत झाली होती. बीसीसीआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बांगलादेश दौऱ्यावर भारताला तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. एकदिवसीय मालिका ४ डिसेंबरपासून म्हणजेच रविवारपासून सुरू होत आहे.

उमरान मलिकची निवड

बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘फास्ट बॉलर मोहम्मद शमीला बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी प्रशिक्षणादरम्यान खांद्याला दुखापत झाली. शमी सध्या एनसीएमध्ये बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे आणि तीन सामन्यांच्या मालिकेत तो भाग घेऊ शकणार नाही. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने शमीच्या जागी उमरान मलिकची निवड केली आहे.

T20 विश्वचषक 2022 नंतर, शमीसह रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली. मोहम्मद शमी हा एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही संघांचा भाग होता आणि जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करण्यास सज्ज होता. मात्र आता त्याला वनडे मालिकेतून वगळणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे.

शमीची दुखापत गंभीर झाल्यास तो १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भाग घेऊ शकणार नाही. सूत्राने वृत्तसंस्थेला पीटीआयला सांगितले की, “शमीची तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुपस्थिती निश्चितच एक फॅक्टर आहे, परंतु सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे कसोटी मालिकेची आहे जिथे जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत त्याला गोलंदाजींचं नेतृत्व करावं लागेल.” भारतीय संघ सध्या मीरपूरमध्ये असून शुक्रवारी भारतीय खेळाडूंनी जोरदार सराव केला.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर, उमरान मलिक आणि कुलदीप सेन.

भारताचा बांगलादेश दौरा

• 4 डिसेंबर, पहिली एकदिवसीय (ढाका) सकाळी 11.30 वाजता

• 7 डिसेंबर, दुसरी वनडे (ढाका) सकाळी 11.30 वाजता

• 10 डिसेंबर, तिसरी एकदिवसीय (ढाका) सकाळी 11.30 वाजता

• 14-18 डिसेंबर, पहिली कसोटी (चितगाव)

• 22 २६ डिसेंबर, दुसरी कसोटी (ढाका)

हे वाचलं का?

    follow whatsapp