भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर; जय शाहांची घोषणा

मुंबई तक

India vs Pakistan Asia Cup: क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शानदार सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना आशिया कप 2023 अंतर्गत खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा यावर्षी सप्टेंबरमध्ये खेळवली जाणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी ही घोषणा केली आहे. जय शाहांनी दिली माहिती जय शाह यांनी ट्विट करून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

India vs Pakistan Asia Cup: क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शानदार सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना आशिया कप 2023 अंतर्गत खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा यावर्षी सप्टेंबरमध्ये खेळवली जाणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी ही घोषणा केली आहे.

जय शाहांनी दिली माहिती

जय शाह यांनी ट्विट करून पुढील दोन वर्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अंतर्गत, त्यांनी सांगितले आहे की, आशिया कप या वर्षी सप्टेंबरमध्ये खेळवला जाईल. ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळवली जाईल. यानंतर टीम इंडियाच्या यजमानपदी एकदिवसीय विश्वचषकही खेळवला जाणार आहे.

जय शाहने आशिया कप 2023 चे संपूर्ण वेळापत्रक जारी केलेले नाही. ही स्पर्धा पाकिस्तानच्या यजमानपदी खेळवली जाणार आहे. तर बीसीसीआयचे सचिव म्हणून जय शाह यांनी काही काळापूर्वी भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नसल्याचे वक्तव्य केले होते. अशा स्थितीत हा आशिया चषक पाकिस्तानातच खेळवला जाणार की अन्य कोणत्या देशात खेळवला जाणार हे अद्याप ठरलेले नाही.

यावेळीही आशिया चषक स्पर्धेत केवळ 6 संघ सहभागी होणार असल्याचे जय शाह यांनी ट्विट केले आहे. हे संघ भारत, पाकिस्तान, गतविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि एक पात्र संघ असेव. हे सर्व संघ दोन गटात विभागले जाणार आहेत. दोन्ही गटांतर्गत 6 संघांमध्ये एकूण 6 सामने खेळवले जाणार आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp