New Zealand विरुद्ध मालिकेत भारताचं नेतृत्व लोकेश राहुलकडे जाण्याची शक्यता

संघातील ज्येष्ठ खेळाडूंना बीसीसीआय विश्रांती देणार
New Zealand विरुद्ध मालिकेत भारताचं नेतृत्व लोकेश राहुलकडे जाण्याची शक्यता

टी-२० विश्वचषकात आतापर्यंत पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. पाकिस्तान पाठोपाठ न्यूझीलंडविरुद्ध सामन्यातही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआयने महत्वाचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या आगामी भारत दौऱ्यात टी-२० मालिकेसाठी सिनीअर खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

या दौऱ्यात लोकेश राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचे संकेत मिळत आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप त्यानंतर इंग्लंड दौरा, आयपीएल आणि टी-२० वर्ल्डकप अशा सर्व स्पर्धा लागून आल्यामुळे भारतीय खेळाडूंवर ताण आलेला आहे. सलग सहा महिने बायो बबलमध्ये राहिल्यामुळे मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत असल्याची कबुली जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडविरुद्ध सामन्यानंतर दिली होती. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यात बीसीसीआय संघातील सिनीअर खेळाडूंना विश्रांती देऊन लोकेश राहुलकडे नेतृत्व सोपवण्याच्या तयारीत आहे.

"सिनीअर खेळाडूंना आता जरा विश्रांतीची गरज आहे. राहुल हा संघाचा अविभाज्य भाग आहे आणि सध्याच्या परिस्थितीत तो टी-२० मालिकेत संघाचं नेतृत्व करण्यासाठी आघाडीवर आहे", BCCI मधील जवळच्या सूत्राने ANI ला माहिती दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे या मालिकेत फॅन्सनाही मैदानात सामने पाहण्याची परवानगी मिळणार आहे.

New Zealand विरुद्ध मालिकेत भारताचं नेतृत्व लोकेश राहुलकडे जाण्याची शक्यता
सिक्सर किंग युवराज पुनरागमन करणार, सोशल मीडियावरुन दिले संकेत

होय, न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत प्रेक्षक मैदानात येऊन सामने पाहू शकणार आहेत. परंतू संपूर्ण क्षमतेने मैदानं भरवली जाणार नाहीत. स्थानिक पातळीवर सरकारी यंत्रणांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला जाईल अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.

New Zealand विरुद्ध मालिकेत भारताचं नेतृत्व लोकेश राहुलकडे जाण्याची शक्यता
BLOG : शेवट गोड व्हावा असं विराटलाच वाटत नसावं !

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in