IND vs PAK: रोहित शर्माचं वादळ-विराटची ताकद…; 5 घटक जे भारताचा पाकविरुद्धचा विजय पक्का करतील
आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (28 ऑगस्ट) शानदार सामना खेळला जात आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार असून सर्वांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. दुबईत होणाऱ्या या सामन्यात टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेणार आहे. दोन मोठ्या संघांमधील हा सामना आहे, त्यामुळे खेळाडूंवर मोठे दडपण असणार आहे. […]
ADVERTISEMENT

आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (28 ऑगस्ट) शानदार सामना खेळला जात आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार असून सर्वांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. दुबईत होणाऱ्या या सामन्यात टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेणार आहे.
दोन मोठ्या संघांमधील हा सामना आहे, त्यामुळे खेळाडूंवर मोठे दडपण असणार आहे. पण तरीही टीम इंडियाचे पारडे जड आहे, कारण संघाकडे मोठ्या खेळाडूंची फौज आहे. त्याचबरोबर अशा मोठ्या उच्च दबावाच्या सामन्यांमध्ये खेळण्याचा अनुभवही भारताकडे आहे.
पाकिस्तानविरुद्ध भारताचं पारडं का जड आहे?
रोहित-राहुलची जोडी करणार कमाल
1) रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर टीम इंडियाने फलंदाजीची पद्धत बदलली आहे. आता पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी दिसून येत आहे. रोहितचा सलामवीर जोडीदार केएल राहुल रोहितसोबत मैदानात उतरणार आहे, त्यामुळे दोघांचीही फलंदाजी पाहायला मजा येणार आहे. 2021 च्या टी-20 विश्वचषकात दोघेही अपयशी ठरले होते, पण यावेळी त्यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे.
2) विराट कोहलीचे पुनरागमन पाकसाठी धोकादायक
टीम इंडियाचा किंग विराट कोहली तब्बल दीड महिन्यानंतर मैदानात परतत आहे. त्याच्या आवडता शत्रू पाकिस्तानविरुद्ध हे पुनरागमन होत आहे. कोहलीला मोठ्या मंचावर चांगल्या धावा करण्याची सवय आहे, त्यामुळे चाहत्यांच्या आशा त्याच्यावर टिकून आहेत. विराट कोहलीचा पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यातील रेकॉर्ड शानदार आहे. त्याने 7 सामन्यात 78 च्या सरासरीने 311 धावा केल्या आहेत.