IND vs PAK: रिझवान-नवाझची कमाल, पाकचा विजय; भारतीय गोलंदाजांची उडाली दाणादाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत-पाकिस्तानच्या हाय होल्टेज सामन्यात पाकिस्तानंन भारताला धूळ चारली आहे. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली होती. परंतु भारताच्या गोलंदाजांना पाकच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आले. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. पाकिस्ताननं 5 विकेटनं भारताचा पराभव केला आहे. आता अंतिम सामन्यात त्यांना श्रीलंकेशी खेळायचे आहे.

विराट कोहलीची बॅट तळपली, गोलंदाजांनी निराशा केली

अनेक दिवसांपासून शांत असलेली विराट कोहलीची बॅट तळपली आहे. आशिया कप २०२२ मध्ये विराट कोहलीनं दुसरं अर्धशतक झळावत पुन्हा फॉर्ममध्ये परतला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या सलामवीरांनी आक्रमक सुरुवात करुन दिली. त्यानंतर मात्र विराट कोहली सोडता मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत स्वस्तात बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेले. परंतु कोहलीनं डावाची मदार आपल्या खांद्यावर घेत भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली.

फलंदाजीमध्ये मोठी धावसंख्या उभारुनही गोलंदाजीमध्ये पुरती निराशा झालेली पाहायला मिळाली. सुरुवातीच्या टप्प्यात भारताच्या गोलंदाजांनी सामन्यावरती पकड मजबूत केली होती परंतु डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजांना मार खावा लागला. रिझवान आणि नवाझ यांनी चमकदार कामगिरी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला आहे. रिझवाननं धावांची खेळी खेळली

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रिझवान, नवाझची चमकदार कामगिरी

पाकिस्तानकडून त्यांचा स्टार फलंदाज बाबर आझम स्वस्तात बाद झाला. परंतु दुसरा सलामवीर मोहम्मद रिझवाननं आणि मोहम्मद नवाज यांनी संघाला विजय मिळवून दिला. दोघांनीही अर्धशतकी पारी खेळत संघाला अंतीम सामन्यात पोहोचवले आहे. रवी बिश्नोईनं बाबरच्या रुपात भारताला पहिला बळी मिळवून दिला. तर दुसरा धक्का चहलनं फकरच्या रुपात दिला. नंतर या दोघांनी डाव सावरला.

असा होता भारत-पाकिस्तानचा संघ

पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह.

ADVERTISEMENT

भारत: केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT