चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियाची बाजी, इंग्लंडचा धुव्वा

मुंबई तक

नवीन वर्षात घरच्या मैदानावर खेळताना पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये दमदार पुनरागमन केलं आहे. इंग्लंडवर ३१७ रन्सनी मात करत विराट कोहलीच्या भारतीय संघाने ४ टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडला विजयासाठी दिलेलं ४८२ धावांचं आव्हान पेलवलं नाही. रविचंद्रन आश्विन आणि अक्षर पटेलच्या जाळ्यात इंग्लंडचे बॅट्समन अलगद […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवीन वर्षात घरच्या मैदानावर खेळताना पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये दमदार पुनरागमन केलं आहे. इंग्लंडवर ३१७ रन्सनी मात करत विराट कोहलीच्या भारतीय संघाने ४ टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडला विजयासाठी दिलेलं ४८२ धावांचं आव्हान पेलवलं नाही. रविचंद्रन आश्विन आणि अक्षर पटेलच्या जाळ्यात इंग्लंडचे बॅट्समन अलगद अडकले.

तिसऱ्या दिवशी रविचंद्रन आश्विनची सेंच्युरी आणि कॅप्टन विराट कोहलीने केलेल्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये २८६ रन्सपर्यंत मजल मारली. ४८२ रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाची सुरुवातच खराब झाली. त्यातचं चेन्नईचं पिच स्पिनर्सला मदत करत असल्यामुळे चौथ्या दिवशी सामना वाचवण्यासाठीचं मोठं आव्हान इंग्लंडकडे होतं.

पण चौथ्या दिवशीही भारतीय स्पिनर्सच्या जाळ्यात इंग्लंडचे बॅट्समन अलगद अडकले. डॅन लॉरेन्सला आऊट करत आश्विनने चौथ्या दिवशी इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर इंग्लंडच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. कॅप्टन जो रुटने अखेरपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे प्रयत्न तोकडेच पडले. १६४ रन्सवर इंग्लंडची दुसरी इनिंग संपुष्टात आली. अक्षर पटेलने दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला. त्याला आश्विन आणि कुलदीपने चांगली साथ दिली. यानंतर दोन्ही टीम्स या अहमदाबादला रवाना होतील. दोन्ही संघांमध्ये मोटेरा मैदानावर डे-नाईट टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp