टी-20 वर्ल्ड कप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, दिग्गजांचं पुनरागमन

टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने आज संघाची घोषणा केली.
टी-20 वर्ल्ड कप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, दिग्गजांचं पुनरागमन

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने आज संघाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये कोणताही मोठा बदल झालेला दिसत नाही. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचं संघात पुनरागमन होणं ही टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. (indian squad for t20 world cup)

T-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (WK), दिनेश कार्तिक (WK), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

बुमराह-हर्षल पटेलचे पुनरागमन

आशिया चषकात पराभवाला सामोरे जावे लागलेल्या टीम इंडियाला टी-20 वर्ल्डकपमधून मोठ्या आशा आहेत. यासाठी भारतीय संघानं आपली बेस्ट प्लेईंग-११ घोषित केली आहे. दुखापतीमुळे बरेच दिवस क्रिकेटपासून दूर असलेले जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचे पुनरागमन झाले आहे. दोघेही ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी तंदुरुस्त आहेत.

जडेजा दुखापतीमुळे बाहेर, अक्षरचे नशीब उजडले

टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा आशिया कपदरम्यान जखमी झाला होता. नुकतीच त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे तो पुढील काही आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहे. यामुळेच रवींद्र जडेजा टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग नाही. त्याच्या जागी अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे.

T-20 विश्वचषकातील भारतीय संघाचं पूर्ण वेळापत्रक

17 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (सराव सामना) सकाळी 9.30

19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड (सराव सामना) दुपारी 1.30

23 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, दुपारी 1.30

27 ऑक्टोबर - भारत विरुद्ध A2, दुपारी 12:30

30 ऑक्टोबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 4.30

2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध बांगलादेश, 1.30

6 नोव्हेंबर - भारत विरुद्ध B1, 1.30

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in