IPL 2021 : प्ले-ऑफ च्या दिशेने मुंबईचं आणखी एक पाऊल, राजस्थान रॉयल्सचा उडवला धुव्वा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या चौदाव्या हंगामात प्ले-ऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. राजस्थानला ९० धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईने विजयासाठी आवश्यक धावा २ विकेट गमावत पूर्ण केलं. राजस्थानवर विजय मिळवल्यानंतर मुंबईला हैदराबादविरुद्ध सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे.

टॉस जिंकून मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. एविन लुईस आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. कुल्टर नाईलने जयस्वालला आऊट करत राजस्थानला पहिला धक्का दिला. यानंतर संघाला लागलेली गळती थांबलीच नाही. एकामागोमाग एक राजस्थानचे फलंदाज आपली विकेट फेकत गेल्यामुळे मुंबईचं काम सोपं झालं. मुंबईकडून कुल्टर-नाईलने ४, जिमी निशमने ३, जसप्रीत बुमराहने २ विकेट घेतल्या.

IPL 2021 : प्ले-ऑफमध्ये चौथ्या स्थानासाठी चुरशीची शर्यत, जाणून घ्या काय आहेत प्रत्येक संघांसाठीचे निकष

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडियन्सनेही सावध सुरुवात केली. क्विंटन डी-कॉकच्या अनुपस्थितीत इशान किशनला सलामीला संधी देण्यात आली. कॅप्टन रोहित शर्माने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये काही सुरेख फटके खेळले. परंतू फटकेबाजी करण्याच्या नादात तो २२ रन्सवर आऊट झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी पुन्हा एकदा भागीदारी संघाच्या डावाला आकार दिला. मुस्तफिजूर रेहमानने सूर्यकुमारला आऊट केलं. परंतू यानंतर इशान किशनने फॉर्मात येऊन राजस्थानच्या बॉलर्सवर हल्ला चढवला. इशानने आपलं अर्धशतक पूर्ण करत संघाच्या विजयात मोलाचा वाटाही उचलला.

राजस्थानविरुद्ध सामना जिंकल्यानंतर मुंबईला आता हैदराबादविरुद्ध सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तसेच राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केल्यास मुंबईचं प्ले-ऑफमधलं स्थान निश्चीत होईल.

ADVERTISEMENT

IPL 2021 : गतविजेत्या मुंबई इंडियन्सची यंदा अशी गत का झाली? जाणून घ्या कारणं…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT