RCB ट्रॉफी जिंकेपर्यंत लग्न करणार नाही, मॅचदरम्यान व्हायरल झालेली 'ती' मुलगी निघाली नाशिकची

नाशिकची ऋतुजा म्हणते यंदा RCB जिंकलं नाही तरीही लग्न लांबवण्याची तयारी
RCB ट्रॉफी जिंकेपर्यंत लग्न करणार नाही, मॅचदरम्यान व्हायरल झालेली 'ती' मुलगी निघाली नाशिकची

- प्रवीण ठाकरे, नाशिक प्रतिनिधी

आयपीएलच्या इतिहासात RCB चा संघ एका वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंतच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने एकदाही स्पर्धेचं विजेतेपद मिळालेलं नाही. 2016 साली RCB ला विजेतेपद मिळवण्याची संधी चालून आलेली होती, परंतू त्यांना उप-विजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे अनेकदा प्रतिस्पर्धी संघाचे चाहते RCB च्या फॅन्सना यावरुन ट्रोलही करतात. यंदाच्या आयपीएल हंगामात RCB ने आपला नवा कर्णधार फाफ डु-प्लेसिसच्या मार्गदर्शनाखाली चांगली सुरुवात केली आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईविरुद्ध सामन्यात RCB च्या एका चाहतीचं सामन्यादरम्यानचं पोस्टर चांगलंच चर्चेत आलं.

RCB जोपर्यंत ट्रॉफी जिंकणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही अशा आशयाचं पोस्टर एका तरुणीने चेन्नईविरुद्ध सामन्यादरम्यान झळकावलं. साहजिकच ही मुलगी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. इतकच काय अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राने या मुलीच्या फोटोवर कमेंट करत, मला या मुलीच्या पालकांबद्दल वाईट वाटत आहे असं म्हणत तिची मस्करी केली.

मुंबई तक ने या मुलीचा शोध घेतला. स्टेडीअममध्ये RCB ला सपोर्ट करायला आलेली ही मुलगी निघाली मुळची नाशिकची. ऋतुजा मताडे असं या तरुणीचं नाव असून ती RCB च्या संघाची मोठी फॅन आहे. तिच्या पोस्टरबद्दल आम्ही तिला विचारलं असता ती आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आपल्या संघाला मोटिवेशन मिळालं आणि त्यांनी आयपीएल जिंकावं हे एकमेव ध्येय असल्याचं ऋतुजाने मुंबई तक शी बोलताना सांगितलं. समजा या वर्षीही RCB आयपीएल जिंकली नाही तर ऋतुजाने लग्नासाठी थांबायची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे यंदा डु-प्लेसिसचाच RCB संघ या आपल्या कट्टर फॅनची इच्छा पूर्ण करतो का हे पहावं लागणार आहे.

RCB ट्रॉफी जिंकेपर्यंत लग्न करणार नाही, मॅचदरम्यान व्हायरल झालेली 'ती' मुलगी निघाली नाशिकची
KKR च्या स्टार क्रिकेटरच्या बायकोचा सोशल मीडियावर कहर

यंदाच्या वर्षात RCB ने आपल्या संघात महत्वपूर्ण बदल केले आहेत. आतापर्यंत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCB ला एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नव्हतं. ज्यामुळे विराटने भारतीय संघाप्रमाणे RCB च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. नवीन हंगामासाठी RCB ने लिलावात फाफ डु-प्लेसिसला संघात दाखल करुन घेत त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे.

RCB ट्रॉफी जिंकेपर्यंत लग्न करणार नाही, मॅचदरम्यान व्हायरल झालेली 'ती' मुलगी निघाली नाशिकची
स्टार IPL खेळाडूंच्या ग्लॅमरस पत्नी

दरम्यान ज्या सामन्यात ऋतुजाने हे पोस्टर झळकावलं होतं त्या सामन्यातही RCB ला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई सुपरकिंग्जने विजयासाठी दिलेल्या 217 धावांचा पाठलाग करताना बंगळुरुचा संघ 193 धावांपर्यंत मजल मारु शकला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in