T20 World Cup : ICC स्पर्धा न जिंकल्याचं दुःख आहेच पण पश्चाताप नाही – माजी प्रशिक्षक रवी शास्त्री

मुंबई तक

नुकत्याच युएईत पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आलं. या पराभवानंतर विराट कोहलीसह प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपलेला आहे. टीम इंडियाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी राहुल द्रविड भारताचा प्रशिक्षक असणार आहे. या निमीत्ताने रवी शास्त्री यांनी इंडिया टुडेला खास मुलाखत दिली. यात बोलत असताना शास्त्री यांनी ICC स्पर्धा न जिंकल्याचं दुःख […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

नुकत्याच युएईत पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आलं. या पराभवानंतर विराट कोहलीसह प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपलेला आहे. टीम इंडियाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी राहुल द्रविड भारताचा प्रशिक्षक असणार आहे. या निमीत्ताने रवी शास्त्री यांनी इंडिया टुडेला खास मुलाखत दिली. यात बोलत असताना शास्त्री यांनी ICC स्पर्धा न जिंकल्याचं दुःख जरुर आहे पण पश्चाताप नाही असं म्हटलं आहे.

आपल्या कार्यकाळात टीम इंडिया परदेशातही जाऊन मालिका जिंकू शकतो हा विश्वास निर्माण झाल्याचा आपल्याला अभिमान असल्याचं शास्त्री यांनी सांगितलं. विराट कोहलीप्रमाणे रवी शास्त्रीही टीम इंडियाला प्रशिक्षक म्हणून आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देऊ शकले नाहीत.

INDvsNZ Tests: कोहलीबरोबर रोहित शर्मालाही विश्रांती; कसोटी संघाचं नेतृत्व मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे

“मला कशाचाही पश्चाताप नाही, गेली पाच वर्ष भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळतो आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. ऑस्ट्रेलियातला भारतीय संघाने मिळवलेला विजय नजरअंदाज करता येणार नाही. ऑस्ट्रेलियात मिळवलेले लागोपाठ विजय हे अविश्वसनिय होते. आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही याचं दुःख नक्कीच आहे पण पश्चाताप नाही. आम्ही एक नाही दोन स्पर्धा जिंकू शकलो असतो, पण तसं झालं नाही. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये गोष्टी काही क्षणांमध्ये बदलत जातात. जर तुमची सुरुवातच चांगली झाली नाही तर तुम्ही लगेच मागे पडू शकता आणि वर्ल्डकपमध्ये हेच झालं.”