साताऱ्यात रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्तीचा थरार, मानाची गदा उचलण्यासाठी मल्लांमध्ये चुरस

मुंबई तक

६४ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला अवघे काही तास उरले आहेत. मंगळवारपासून साताऱ्यात या स्पर्धेला सुरुवात होणार असून मल्लांसाठी मैदानं आणि आखाड्याच्या तयारीवर अंतिम हात फिरवला जात आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. दोन वर्ष कोरोना काळात स्पर्धा बंद होत्या, ज्यानंतर यंदा पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळवली जाणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

६४ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला अवघे काही तास उरले आहेत. मंगळवारपासून साताऱ्यात या स्पर्धेला सुरुवात होणार असून मल्लांसाठी मैदानं आणि आखाड्याच्या तयारीवर अंतिम हात फिरवला जात आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. दोन वर्ष कोरोना काळात स्पर्धा बंद होत्या, ज्यानंतर यंदा पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

२०१८ साली महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा नाशिकचा हर्षवर्धन सदगीर, बुलढाण्याचा मल्ल बाला रफीक यांच्याकडे यंदा कुस्तीप्रेमींचं लक्ष असणार आहे. याव्यतिरीक्त आदर्श गुंड, गणेश जगताप, पृथ्वीराज मोहोळ, हर्षद कोकाटे हे नवे मल्ल आखाड्यात आपलं नशीब आजमावणार आहेत. साताऱ्यात अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

होम ग्राऊंडवर साताऱ्याला महाराष्ट्र केसरी गदेची प्रतीक्षा –

सातारला दोन दशकापासून महाराष्ट्र केसरीच्या गदेने हुलकावणी दिली आहे. यंदा होम ग्राऊंडवर सातारला गदा मिळवून देण्यासाठी किरण भगत माती गटातून उतरला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर किरण भगतची ही पहिली स्पर्धा आहे. त्याच्या कामगिरीवर सातारकरांचं लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे गादी गटात नवख्या दिग्वीजय जाधवर सातारा जिल्ह्याची मदार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp