जास्तीचा वन-डे, टी-२० सामना खेळण्यास तयार पण…England विरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यावर गांगुलीचं वक्तव्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातला १० ते १४ सप्टेंबर दरम्यानचा ओल्ड ट्रॅफर्ड येथील अखेरचा कसोटी सामना रद्द करण्यात आला. भारतीय गोटात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे खेळाडूंनी अखेरचा सामना खेळण्यासाठी नकार दर्शवला. मालिकेत सध्या टीम इंडिया २-१ ने आघाडीवर आहे. परंतू अखेरच्या कसोटी सामन्याचा निकाल काय यावरुन बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डात वाद सुरु असल्यामुळे निकाल प्रलंबित ठेवण्यात आलाय.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने या प्रकरणी महत्वाचं वक्तव्य केलंय.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या प्रकरणात आयसीसीच्या तंटा निवारस समितीला पत्र लिहून निर्णय देण्याची आणि मध्यस्थीची मागणी केली आहे. ज्यावर आयसीसीने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. परंतू कोणत्याही परिस्थितीत अखेरचा कसोटी सामना हा मालिकेचाच भाग असेल या भूमिकेवरुन मागे हटण्यास बीसीसीआय तयार नाहीये.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अखेरचा कसोटी सामना पुन्हा आयोजित करण्याची तयारी दाखवून तो या मालिकेचा भाग नसेल अशी अट घातली होती. ज्याला गांगुलीने आज स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. “आमची इच्छा आहे की ही मालिका पूर्ण व्हावी. २००७ नंतर इंग्लंडमध्ये हा आमचा पहिलाच मालिका विजय असेल. अखेरच्या कसोटी सामन्यातबाबत कोणतीही तडजोड होऊ नये हे आमचं मत आहे. पुढील वर्षात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल तेव्हा जादा टी-२० आणि वन-डे सामना खेळण्याची आमची तयारी आहे. परंतू यानंतर जो कसोटी सामना खेळवला जाईल तो मालिकेतला पाचवा कसोटी सामना असावा हे आमचं मत आहे.”

इंग्लंड विरुद्ध भारत संघात कसोटी मालिका सुरु असताना भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओ योगेश परमार कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

ADVERTISEMENT

Ind vs Eng 5th test : पाचवा सामना रद्द; BCCI ने इंग्लंड बोर्डासमोर ठेवला नवा प्रस्ताव

ADVERTISEMENT

त्यानंतर भारतीय खेळाडूंनी मँचेस्टर कसोटी खेळण्यास नकार दिला. जर या सामन्याला ‘रद्द सामना’ श्रेणीत ठेवले गेले, तर ईसीबीला ४ कोटी पौउंडची विमा रक्कम मिळेल. तसेच जर आयसीसीला असे वाटत असेल की या सामन्याचे आयोजन कोविड-१९ कारणामुळे झाले नाही, तर भारत अधिकृतपणे २-१ ने मालिका जिंकेल. तसेच अशा प्रकारे सामने रद्द करणे कोविडशी संबंधित जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या नियमांनुसार स्वीकार्य मानले जाते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT