निसटलेला डाव सावरण्यासाठी मुंबईचा शेवटचा प्रयत्न, ‘या’ बॉलरला संघात संधी मिळण्याचे संकेत?

मुंबई तक

पाच वेळा आयपीएल हंगामाचं विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातली कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. सलग सहा सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचं यंदाच्या हंगामात प्ले-ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे. यंदाच्या हंगामात ऑक्शनपासून मुंबई इंडियन्सची रणनिती चुकत गेल्याची खंत सोशल मीडियावर अनेक क्रिकेट चाहते आणि माजी खेळाडूंनी बोलून दाखवली. अशा परिस्थितीत आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पाच वेळा आयपीएल हंगामाचं विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातली कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. सलग सहा सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचं यंदाच्या हंगामात प्ले-ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे. यंदाच्या हंगामात ऑक्शनपासून मुंबई इंडियन्सची रणनिती चुकत गेल्याची खंत सोशल मीडियावर अनेक क्रिकेट चाहते आणि माजी खेळाडूंनी बोलून दाखवली.

अशा परिस्थितीत आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने हातातून निसटत चाललेला डाव सावरण्यासाठी एक शेवटचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णीला यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्समध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

सलग सहा पराभवांनंतर मुंबईचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर फेकला गेला आहे. यापुढील सामन्यांमध्ये मुंबईचा दोन सामन्यांत झालेला पराभव त्यांचं यंदाच्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आणू शकतो. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सने अनुभवी गोलंदाज म्हणून धवलला संधी देण्याचे प्रयत्न सुरु केले असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp