मुलगी तापाने फणफणत असतानाही शमी मैदानात उतरला, ६ विकेट घेत संघाला सामना जिंकवून दिला

मुंबई तक

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तानने १० विकेट राखून सामना जिंकला. आतापर्यंत वर्ल्डकपच्या इतिहासातला पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. भारतीय संघाच्या या खराब कामगिरीनंतर चाहते साहजिकच नाराज झाले आहेत. परंतू यापैकी काही चाहत्यांनी सोशल मीडियावर मोहम्मद शमीच्या निष्ठेविषयी शंका घेत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानकडूनच खेळायचं होतं तर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तानने १० विकेट राखून सामना जिंकला. आतापर्यंत वर्ल्डकपच्या इतिहासातला पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. भारतीय संघाच्या या खराब कामगिरीनंतर चाहते साहजिकच नाराज झाले आहेत. परंतू यापैकी काही चाहत्यांनी सोशल मीडियावर मोहम्मद शमीच्या निष्ठेविषयी शंका घेत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तानकडूनच खेळायचं होतं तर निळी जर्सी घालून का उतरलास अशा प्रकारच्या कमेंट शमीच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर केल्या जात आहेत. परंतू भारतीय संघाकडून खेळणाऱ्या मोहम्मद शमीच्या खासगी आयुष्यात आतापर्यंत अनेक वादळं आली. परंतू या सगळ्या अडचणींवर मात करत शमी प्रत्येक वेळा मैदानात उतरला आणि त्याने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. सोशल मीडियावर शमीला ट्रोल करणाऱ्या ट्रोलभैरवांना कदाचीत ही बाब माहिती नसेल की आपली मुलगी तापाने फणफणलेली असतानाही शमी टीम इंडियाकडून आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरला होता.

जाणून घ्या काय घडलं होतं त्यावेळी नेमकं?

हा प्रसंग साधारण पाच वर्षांपूर्वीचा आहे. २०१६ मध्ये कोलकात्यामध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळवला जात होता. त्यावेळी शमीची १४ महिन्यांची मुलगी तापाने आजारी पडली होती. यावेळी शमीच्या मुलीला श्वास घ्यायलाही प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. अशी परिस्थिती आलेली असतानाही शमी त्यावेळी मैदानात टिकून राहिला आणि त्याने आपलं कर्तव्य पूर्ण करत ६ विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचं योगदान बजावलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp