एकाच वेळी दोन संघ मैदानात, याआधीही २३ वर्षांपूर्वी BCCI ने केला होता प्रयोग

मुंबई तक

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा हंगाम मध्यावधीत स्थगित करावा लागल्यानंतर जुन महिन्यापासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हंगाम सुरु होईल. भारतीय संघ इंग्लंड आणि श्रीलंकेचा दौरा करणार असल्यामुळे बीसीसीआयने एकाचवेळी दोन भारतीय संघ मैदानावर उतरवण्याचं ठरवलंय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली प्रमुख भारतीय संघ हा इंग्लंडमध्ये WTC ची फायनल आणि इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीज खेळेल. तर याच दरम्यान तरुणांचा भारतीय संघ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा हंगाम मध्यावधीत स्थगित करावा लागल्यानंतर जुन महिन्यापासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हंगाम सुरु होईल. भारतीय संघ इंग्लंड आणि श्रीलंकेचा दौरा करणार असल्यामुळे बीसीसीआयने एकाचवेळी दोन भारतीय संघ मैदानावर उतरवण्याचं ठरवलंय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली प्रमुख भारतीय संघ हा इंग्लंडमध्ये WTC ची फायनल आणि इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीज खेळेल. तर याच दरम्यान तरुणांचा भारतीय संघ लिमीटेड ओव्हर सिरीजसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाईल.

परंतू एकाच वेळी दोन संघ मैदानावर उतरवण्याची भारताची ही पहिलीच वेळ नाहीये. १९९८ मध्ये सहारा कप आणि क्वाललांपूरमध्ये भरवण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांचं आयोजन हे एकाच वेळी करण्यात आलं होतं. ज्यासाठी भारताने आपले दोन संघ मैदानावर उतरवले होते. अजय जाडेजाच्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या खेळाडूंचा संघ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तर मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली सौरव गांगुली, राहुल द्रविड, जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद या खेळाडूंचा संघ सहारा कप स्पर्धेसाठी उतरला होता.

महत्वाची गोष्ट म्हणजे बीसीसीआय सुरुवातीला राष्ट्रकुल स्पर्धेसाठी संघ पाठवण्याच्या तयारीत नव्हतं. परंतू या विषयावर चर्चा आणि वाद-विवाद झाल्यानंतर अखेरीस बीसीसीआयने राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघ मैदानात उतरवला होता. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचा समावेश ब गटात अँटीग्वा, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांच्यासोबत करण्यात आला होता. तसेच या सामन्यांना List A क्रिकेटचा दर्जा देण्यात आला होता. हे सामने लाल बॉलवर पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळवण्यात आले होते.

कोच म्हणून राहुल द्रविडची आतापर्यंत कामगिरी कशी? जाणून घ्या…