IPL : तेराव्या सिझनमध्ये ठरले फ्लॉप, या हंगामात असेल मोठी जबाबदारी
आयपीएलचा तेरावा हंगाम २०२० मध्ये युएईत पार पडला. जगभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन बीसीसीआयने युएईत स्पर्धेचं आयोजन केलं. मुंबई इंडियन्सने पहिल्यापासून स्पर्धेवर वर्चस्व कायम राखत आपला दबदबा कायम राखला. फायनल मॅचमध्ये मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला हरवून पाचवं विजेतेपद मिळवलं. या हंगामात अनेक अनपेक्षित गोष्टीही घडल्या. नेहमी अंतिम फेरीच्या शर्यतीत असलेला चेन्नई सुपरकिंग्जचा […]
ADVERTISEMENT

आयपीएलचा तेरावा हंगाम २०२० मध्ये युएईत पार पडला. जगभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन बीसीसीआयने युएईत स्पर्धेचं आयोजन केलं. मुंबई इंडियन्सने पहिल्यापासून स्पर्धेवर वर्चस्व कायम राखत आपला दबदबा कायम राखला. फायनल मॅचमध्ये मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला हरवून पाचवं विजेतेपद मिळवलं. या हंगामात अनेक अनपेक्षित गोष्टीही घडल्या. नेहमी अंतिम फेरीच्या शर्यतीत असलेला चेन्नई सुपरकिंग्जचा संघ २०२० मध्ये साखळी फेरीतूनच बाहेर फेकला गेला.
याचसोबत अनेक महत्वाच्या खेळाडूंची २०२० च्या आयपीएलमध्ये कामगिरी अत्यंत खराब झाली. बीसीसीआयने आयपीएलच्या पुढच्या हंगामाची तयारी सुरु केली आहे. पुढील हंगामात महत्वाच्या ५ खेळाडूंना आपली कामगिरी सुधारण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
५) स्टिव्ह स्मिथ (RR) – ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन स्टिव्ह स्मिथच्या क्षमतेवर कोणालाही अविश्वास नसेल. परंतू आयपीएलचा विचार केला असता २०२० हे वर्ष स्मिथसाठी अत्यंत खराब गेलं. २०२० च्या हंगामात पहिल्या दोन सामन्यांमध्ये हाफ सेंच्युरी झळकावत स्मिथने दिमाखात सुरुवात केली, मात्र यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याचा सूर हरवला. राजस्थान रॉयल्सचा संघ हा स्मिथवर अवलंबून असतो, अशा परिस्थितीत स्मिथ अपयशी ठरत गेल्यामुळे राजस्थानची गाडीही रुळावरुन खाली घसरली. राजस्थानच्या संघाचं कर्णधारपद स्मिथकडे असल्यामुळे त्याचं अपयश चांगलंच जाणवलं. त्यामुळे पुढील हंगामात स्मिथला संघासोबत आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
४) ऋषभ पंत (DC) – दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने २०२० च्या हंगामात सर्वांना चकीत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. सुरुवातीला चांगली सुरुवात केलेल्या दिल्लीची गाडीही मधल्या काळात घसरली होती. सलामीच्या जागेसाठी दिल्लीने अनेक पर्याय वापरुन पाहिले. यात दिल्लीच्या काही खेळाडूंनी आपली चमकही दाखवली, परंतू ऋषभ पंतचं अपयश हे दिल्लीसाठी चिंतेचा विषय बनलं होतं. २०२० मध्ये १४ सामन्यांत पंतने फक्त ३४३ रन्स केल्या. ज्यात अंतिम फेरीत केलेल्या एकमेव हाफ सेंच्युरीचा समावेश होता.