Sania Mirza सोबत घटस्फोट? शोएब मलिकने ‘या’ अभिनेत्रीसोबत केलं तिसरे लग्न..
Sania Mirza divorce: पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने तिसरे लग्न केले आहे. एकीकडे सानिया मिर्झासोबत घटस्फोटाच्या बातम्या समोर असताना अचानक शोएबच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो समोर आले आहे.
ADVERTISEMENT

Sania Mirza divorce and Shoaib Malik Third Marraige: पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने तिसरे लग्न केले आहे. हे लग्न अशा वेळी झाले जेव्हा सानिया मिर्झासोबत त्याचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत होत्या. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदची जीवनसाथी म्हणून निवड केली असून एका समारंभात हे लग्न पार पडले. शोएब मलिकने स्वतः इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. (amidst the news of divorce from sania mirza shoaib malik got married for the third time made this actress his life partner)
सनाचेही दुसरे लग्न
शोएबने लग्न केलेल्या सना जावेदच हिचाही घटस्फोट झाला आहे. पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सना जावेदने 2020 मध्ये उमेर जसवालशी लग्न केलेले, परंतु लवकरच हे समोर आलं की, या जोडप्यामध्ये सर्व काही ठीक नाही. नंतर दोघांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले आणि त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली होती.
28 वर्षीय सना जावेद पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे, तिच्याकडे ए मुश्त-ए-खाक, डंक आणि इतर अनेक प्रसिद्ध शो आहेत. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.