MS Dhoni : ‘…तेव्हा तुम्हाला धोनीची खरी किंमत कळेल’, नेहराचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

ashish nehra praised ms dhoni, old video goes viral
ashish nehra praised ms dhoni, old video goes viral
social share
google news

Ashish Nehra on MS Dhoni Video : विश्वचषक (World Cup 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरलं, तर भारताची हॅटट्रिक करण्याची संधी गेली. या पराभवानंतर संमिश्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. एकीकडे टीम इंडियाचं मनोबल क्रिकेटप्रेमी वाढवत आहेत. तर दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीची आठवणही काढली जात आहे. अशातच सोशल मीडियावर भारताचा माजी आशिष नेहराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आशिष नेहराने महत्त्वाच्या सामन्यात धोनी का हवा, याबद्दल तोंडभरून कौतुक केलं आहे.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. काही क्षण सोडले, तर एकाकीच हा सामना झाल्याचं बघायला मिळालं. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासून सामन्यावर मिळवलेली पकड शेवटपर्यंत सैल होऊ दिली नाही. अंतिम सामन्यात पोहोचलेली टीम इंडिया उपविजेता ठरली आणि क्रिकेटप्रेमींच्या विश्वकप जिंकण्याच्या स्वप्नाचा चुराडा झाला.

भारताचा पराभव… महेंद्रसिंग धोनीची आठवण

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींना महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली. महेंद्रसिंग धोनी असता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असं मत अनेकांनी मांडलं. स्टम्पच्या मागे राहून सामन्याचा निकाल बदलवण्याची क्षमता असणारा एक खेळाडू होता, असे कौतुकाचे बोल लोक सोशल मीडियावर व्यक्त करताहेत. यातच भारताचा माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहराचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आशिष नेहराने एमएस धोनीबद्दल काय बोललाय?

एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आशिष नेहरा धोनीच्या नेतृत्वाबद्दल बोलत आहे. नेहरा म्हणतो, “महेंद्रसिंग धोनी असा खेळाडू आहे… एक असतं की खेळ आपोआप चालतोय आणि दुसरं असतं की तुम्ही खेळ चालवताय. धोनी खेळ चालवतो. आणि जेव्हा असे सामने असतात, तेव्हा तो खेळाडू मैदानात हवा, जो खेळ चालवतो.”

हे ही वाचा >> पुढचा विश्वचषक होणार खास! कधी, कुठे अन् किती असणार टीम… जाणून घ्या

“जर विराट कोहली खेळत असेल आणि 100 धावांवर 2 गडी बाद आहेत. तरीही तो (एमएस धोनी) विराट कोहलीलाही बोलेल की तीनशे नाही करायचेत, अडीचशे करायचेत. अडीचशे बघू तर तीनशे होतील. खेळपट्टी फ्लॅट आहे तर हळू खेळ. वेळ घे. आणि त्याला माहितीये की तो स्वतःही अखेरीला खूप चांगले फटके मारू शकतो.”

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> रोहितच्या ‘या’ 2 चुकांमुळे गेला World cup, गोलंदाजीवेळी झाली घोडचूक

ADVERTISEMENT

“धोनी नसेल, तेव्हा त्याची किंमत कळेल”

“त्याचा (एमएस धोनी) जी बुद्धी आहे ना, ती खूप गरजेची आहे. तो विराट कोहलीची खूप मदत करतो आणि पूर्ण संघाची मदत करतो. आणि त्याची (एमएस धोनी) किंमत तुम्हाला तेव्हा कळेल, जेव्हा तो जाईल (निवृत्त होईल)”, असं आशिष नेहरा धोनीबद्दल बोलत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT