Asian Games 2023: भारताने नेमबाजीत खातं खोललं, ‘रौप्य’मुळे उंचवल्या आशा

मुंबई तक

ADVERTISEMENT

asian games 2023 india wins medals silver women 10 meter air rifle and mens lightweight doubles scull final
asian games 2023 india wins medals silver women 10 meter air rifle and mens lightweight doubles scull final
social share
google news

Asian Games 2023: भारताने एशियन गेम्स 2023 च्या पहिल्याच दिवशी नेमबाजीत पदक मिळवल्याने आता या आशियाई स्पर्धेकडून (Asian Games) भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारताने अगदी कमी कालावधीत दोन पदकांवर भारताचे नाव कोरले आहे. भारताला (Indian Plyers) मिळालेली दोन्ही पदके ही रौप्य मिळाली आहेत. पहिले पदक हे नेमबाजीत (air rifle) तर दुसरं पदक पुरुष दुहेरी लाइटवेट स्कलमध्ये जिंकले आहे.

ADVERTISEMENT

भारतीय खेळाडूंची बाजी

महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारामध्ये भारताने रौप्यपदक जिंकून पदकांचे खाते उघडले आहे. दुसरे रौप्य हे स्कलमध्ये मिळवत भारतीय खेळाडूंनी लाइटवेट प्रकारात बाजी मारली. एशियन गेम्समधील भारताच्या या खेळामुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

हे ही वाचा >>Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार, नागपूरमध्ये पुन्हा मुसळधार

एअर रायफलमध्ये रौप्य

एशियन गेम्स 2023 मध्ये नेमबाजीमध्ये भारताने पदकतालिकेत आपलं खातं उघडले आहे. यामध्ये भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी या तीनही महिला खेळाडूंनी 10 मीटर एअर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. या तिघी खेळाडूंनी मिळून 1886 गुण मिळवले आहेत. त्यामध्ये रमिताने 631.9 गुण मिळवले आहेत, तर मेहुलीने 630.8 तर आशीने 623.3 असं गुण मिळवले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Maratha Morcha : ‘…आता माघार घेणार नाही’, जरांगे पाटलांचा पुन्हा थेट इशारा

चीनकडे ‘सुवर्ण’पदक

भारताने नेमबाजीत रौप्यपदक मिळवून पदकांवर आपले नाव कोरले असतानाच काही वेळातच भारताला दुहेरी स्कल्समध्येही पदक मिळवून आनंद साजरा करता आला. तर पुरुषांच्या लाइटवेट प्रकारात भारताच्या अर्जुन सिंग आणि जाट सिंग यांनी 6:28:18 या वेळेनुसार त्यांनी रौप्य पदकावर आपले नाव कोरले, तर या स्पर्धेचे सुवर्णपदक चीनकडे गेले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT