ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्यावर पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचं मोठं विधान, म्हणाले…

मुंबई तक

भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. दरम्यान आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मायदेशी परतण्यावर पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मोठं विधान केलं आहे. भारतात आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात परत येण्याची सोय स्वतः करावी, असं मॉरिसन यांनी म्हटलं आहे. मॉरिसन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, “आयपीएल खेळण्यासाठी गेलेले खेळाडू […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. दरम्यान आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मायदेशी परतण्यावर पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मोठं विधान केलं आहे. भारतात आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात परत येण्याची सोय स्वतः करावी, असं मॉरिसन यांनी म्हटलं आहे.

मॉरिसन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, “आयपीएल खेळण्यासाठी गेलेले खेळाडू हे वैयक्तिक खेळासाठी गेले आहेत. कोणत्याही ऑस्ट्रेलियन दौऱ्याचा ते भाग नाहीत. ते स्वतः तिथे पोहोचले असून मला खात्री आहे की ते त्यांच्या व्यवस्थेनुसार ऑस्ट्रेलियात परततील.”

IPL 2021 : आमच्यासाठी Charter Plane ची सोय करा – ख्रिस लिनचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला साकडं

ऑस्ट्रेलियन सरकारने भारतात कोरोनाची परिस्थिती पाहता हवाई वाहतूकीवर काही निर्बंध घातले आहेत. येणाऱ्या काळात ऑस्ट्रेलियन सरकार भारतामधून हवाई वाहतूक बंद करण्याच्या विचारात आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचे 14 खेळाडू आयपीएल खेळतायत. याशिवाय कोच रिकी पॉटिंग आणि साइमन कॅटिच, कॉमेंटेटर मैथ्यू हेडन, ब्रेट ली, माइकल स्लेटर आणि लीसा स्थळेकर भारतात आहे. तर आतापर्यंत जोश हेजलवूड, केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा, अँड्रू टाय या परदेशी खेळाडूंनी आय़पीएलच्या 14 व्या सिझनमधून माघार घेतली आहे.

नुकतंच मुंबई इंडियन्सचा फलंदाज आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ख्रिस लिनने यंदाची स्पर्धा संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी क्रिकेट बोर्डाने चार्टर्ड विमानाची सोय करावी अशी मागणी केली आहे. 30 मे रोजी आयपीलएलचा अंतिम सामना रंगणार आहे. दरम्यान या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काही काळ थांबण्याचा निर्णय़ घेतला असून आयपीएलमध्ये सहभागी असलेले क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि कॉमेंटेटर यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp