World Cup 2023 : ”बाबर आझम ढसाढसा रडला”, ड्रेसिंग रुममधली Inside Story
मी ऐकलं आहे की, अफगाणिस्तान विरूद्ध पराभवानंतर बाबर आझम रडत होता. पण ही बाबरची चुक नाही आहे, यामध्ये संपूर्ण टीम आणि मॅनेजमेंट देखील दोषी आहेत, असे विधान करून मोहम्मद युसूफ यांनी बाबरची पाठराखण केली आहे.
ADVERTISEMENT
Babar Azam Pakistan VS Afganistan Odi World Cup 2023 : भारतात सुरु असलेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये दुबळ्या अफगाणिस्तानने (Afganistan) पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केला आहे. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये सात वेळा पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. मात्र पहिल्यांदाच अफगाणिस्ताने वर्ल्ड कपमध्ये (Odi World Cup 2023) पाकिस्तानला हरवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे. या सर्व घडामोडींवर आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) रडल्याचे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद युसूफने तसा दावा केला आहे. (babar azam cried after loss match against afganistan ex pakistan captain big statement odi world cup 2023)
ADVERTISEMENT
बाबरची पाठराखण
वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर बाबर आझमवर चहुबाजूंनी टीका होत आहे. बाबरवर ही टीका होत असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद युसूफ त्याच्या मदतीला धावून आला आहे आणि त्याने त्याची पाठराखण केली आहे. मी ऐकलं आहे की, अफगाणिस्तान विरूद्ध पराभवानंतर बाबर आझम रडत होता. पण ही बाबरची चुक नाही आहे, यामध्ये संपूर्ण टीम आणि मॅनेजमेंट देखील दोषी आहेत, असे विधान करून मोहम्मद युसूफ यांनी बाबरची पाठराखण केली आहे.
हे ही वाचा : भावाच्या कृत्याने अलिबाग हादरलं! सख्ख्या बहिणींना ‘सूप’मधून दिला विषाचा ‘घोट’
मोहम्मद युसूफ पुढे म्हणतात की, बाबर आझमसाठी सध्या कठीण काळ आहे. पण संपूर्ण पाकिस्तान त्यांच्यासोबत आहे, असे ते म्हणाले. दरम्यान अफगाणिस्तानविरूद्ध पराभवाने संपूर्ण संघाला दु:ख झाले आहे, असे विधान बाबर आझमने केले होते. तसेच मला विश्वास आहे की, या पराभवातून आम्ही नक्कीच काहीतरी शिकू.
हे वाचलं का?
असा रंगला सामना
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 282 धावांचा डोंगर उभारला होता. पाकिस्तानकडून बाबर आझमने 74 धावांची तर अब्दुल्लाहने 58 धावांची अर्धशतकीय खेळी केली. या खेळीच्या बळावर पाकिस्तानने ही धावसंख्या उभारली होती. तर अफगाणिस्तानकडून नुर अहमदने 3 विकेट, नवीन उल हकने 2 तर मोहम्मद नबीने 1 विकेट घेतला.
पाकिस्तानने दिलेल्या 282 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या अफगाणिस्तानने 8 विकेट राखून हा विजय मिळवला. अफगाणिस्तानकडून इब्राहिम जादरानने 87 धावा, रेहमत शाहने 77 तर रहमनुल्लाह गुरबाजने 65 धावा केल्या. अशाप्रकारे 2 विकेट गमावून 286 धावा करत हा सहज विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Manoj Jarange : ‘…तोपर्यंत आम्ही फाशी घ्यायची का?’, गिरीश महाजनांना जरांगेंचा संतप्त सवाल
सेमी फायनल गाठणार का?
दरम्यान अफगाणिस्तानविरूद्ध पराभवानंतर पाकिस्तानची सेमी फायनलची शर्यंत कठीण बनली आहे. पाकिस्तानला आता त्यांचे पुढचे चारही सामने जिंकावे लागणार आहेत.तसेच पाकिस्तानचा रनरेट देखील कमी आहे, त्यामुळे त्यांना हे सामने जिंकताना रनरेट देखील वाढवावा लागणार आहे. यासोबत इंतर संघाच्या विजयावर आणि पराभवावर पाकिस्तानला निर्भर रहावे लागणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT