T-20 World Cup : टीम इंडियाची घोषणा, रविचंद्रन आश्विन-भुवनेश्वर संघात परतले

मुंबई तक

आगामी टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन चौहान यांनी पत्रकार परिषदेत या संघाची घोषणा केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघात रविचंद्रन आश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांनी पुनरागमन केलं आहे. TEAM – Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), KL Rahul, Suryakumar Yadav, Rishabh […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

आगामी टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन चौहान यांनी पत्रकार परिषदेत या संघाची घोषणा केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघात रविचंद्रन आश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांनी पुनरागमन केलं आहे.

महत्वाच्या स्पर्धेसाठी बीसीसीआयने महेंद्रसिंह धोनीकडे संघाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवली आहे. धोनी या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून युएईला जाणार आहे.

असा असेल टीम इंडियाचा संपूर्ण संघ –

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा (व्हाईस कॅप्टन), लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन (दोघेही यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, राहुल चहर, रविचंद्रन आश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

हे वाचलं का?