IPL 2021 : टायटल स्पॉन्सरशीपसाठी BCCI नव्याने टेंडर काढणार?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

युएईत आयपीएलचा तेरावा सिझन पार पडल्यानंतर बीसीसीआयने लगेच पुढच्या सिझनची तयारी केली आहे. २०२० मध्ये भारत-चीन यांच्यातील डोकलाम सीमेवर झालेल्या संघर्षामुळे VIVO या चिनी मोबाईल कंपनीसोबतचा करार बीसीसीआयला स्थगित करावा लागला होता. UAE मध्ये पार पडलेल्या स्पर्धेसाठी बीसीसीआयने २२२ कोटींच्या बोलीवर Dream 11 ला टायटन स्पॉन्सरचे हक्क दिले. २०१८ साली VIVO आणि BCCI यांच्यात करार झाला, ज्यानुसार प्रत्येक सिझनसाठी VIVO कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती.

डोकलाम संघर्षामुळे चिनी वस्तूंविरोधात भारतात तयार झालेलं वातावरण पाहता बीसीसीआयने VIVO सोबतचा करार एका वर्षासाठी स्थगित केला. परंतू नवीन सिझनसाठी VIVO टायटन स्पॉन्सरच्या रुपात परतणार की नाही याबद्दल साशंकता आहे. सध्याच्या घडीला आयपीएलच्या पुढील सिझनसाठी नवीन टेंडर्स मागवणं हा एकच ऑप्शन समोर दिसतो आहे. आयपीएल २०२० साठी झालेला करार आता संपला आहे आणि त्यामुळे पुन्हा त्यांना संधी देता येणार नाही. VIVO सोबतचा करार सध्याच्या परिस्थितीत पूर्ववत होईल याचीही शक्यता कमी आहे. त्यामुळे नवीन टेंडर्सबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली.

१८ फेब्रुवारीला आयपीएलच्या चौदाव्या सिझनचं ऑक्शन चेन्नईत पार पडणार आहे. आयपीएल २०२० साठी बीसीसीआयला २२२ कोटी मिळाले होते, त्यामुळे बीसीसीआय नवीन सिझनसाठी किमान ४४० कोटी रुपयांची किंमत मिळेल असा प्रयत्न करत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT