IPL 2021- कमिन्स आणि रसेलची झुंजार खेळी व्यर्थ; चेन्नईचा केकेआरवर 18 धावांनी विजय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या 14 व्या सिझनमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांचा सामना रंगला होता. या रंगतदार सामन्यात अखेर चेन्नईने बाजी मारत कोलकात्याचा पराभव केलाय.

चेन्नईने कोलकात्याला 220 रन्संचं तगडं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. शुभमन गिल एकंही रन न काढता माघारी परतला. त्यानंतर आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक तसंच पॅट कमिन्सने उत्तम खेळी करत टीमला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्वांची झुंज अपयशी ठरली. कोलकाताला सर्वबाद 202 रन्सच करता आले. चेन्नईकडून दिपक चहरला 4, सॅम करनला 1 तर लुंगी एनगिडीने 3 विकेट्स घेतल्यात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चेन्नईने कोलकातावर 18 धावांनी विजय मिळवला. चेन्नईचे सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी धडाकेबाज फलंदाजी करत कोलकाताच्या गोलंदाजांना धूळ चारली. ऋतुराजने 64 रन्स तर डु प्लेसिसने नाबाद 95 रन्सची खेळी केली. कोलकत्याकडून वरूण चक्रवर्ती, सुनिल नरीन आणि आंद्रे रसल यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत.

ADVERTISEMENT

चेन्नईचा हा सलग तिसरा विजय होता. तर केकेआरने आतापर्यंत 3 सामने गमावले आहेत. या विजयासह चेन्नईने पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT