मी आणि शिखर संघाबाहेर बसू का? विंडीजविरुद्ध पहिल्या सामन्याआधी रोहितं असं का म्हणाला?
रोहित शर्मा हा मैदानात ज्या पद्धतीने बॉलर्सची धुलाई करण्यासाठी ओळखला जातो. त्याच पद्धतीने मैदानाबाहेर तो पत्रकारांच्या प्रश्नाला मजेशीर उत्तर देण्यासाठीही ओळखला जातो. रविवारपासून भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. दुखापतीमुळे रोहितला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सहभागी होता आलं नव्हतं. भारतीय संघात गेल्या काही महिन्यांपासून ऋतुराज गायकवाड, इशान किशन हे खेळाडू चमकदार कामगिरी करत […]
ADVERTISEMENT

रोहित शर्मा हा मैदानात ज्या पद्धतीने बॉलर्सची धुलाई करण्यासाठी ओळखला जातो. त्याच पद्धतीने मैदानाबाहेर तो पत्रकारांच्या प्रश्नाला मजेशीर उत्तर देण्यासाठीही ओळखला जातो. रविवारपासून भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे.
दुखापतीमुळे रोहितला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सहभागी होता आलं नव्हतं.
भारतीय संघात गेल्या काही महिन्यांपासून ऋतुराज गायकवाड, इशान किशन हे खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. परंतू या खेळाडूंना अद्याप म्हणावी तशी संधी मिळाली नाही. पत्रकार परिषदेत याबद्दल प्रश्न विचारला असता रोहितने आपल्या मिष्कील स्वभावात, “तुम्हाला मी आणि शिखरने बाहेर बसायला हवंय का? भविष्यात त्यांचीही (तरुण खेळाडूंची) वेळ येईल.”
Ind vs WI : ठरलं ! ‘हा’ खेळाडू येणार रोहित शर्मासोबत सलामीला