दुसऱ्या टेस्टवर भारताची मजबूत पकड, इंग्लंड बॅकफूटवर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चेन्नई: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचवर भारताने मजबूत पकड घेतली आहे. दुसऱ्या दिवसाअखेर भारताने इंग्लंडवर तब्बल 249 रन्सची अशी प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचं पारडं बरंच जड आहे. चेन्नईच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे आता चेन्नईमधील दुसऱ्याच कसोटीत इंग्लंडला पराभवाचा धक्का देऊन हिशोब तिथला तिथे चुकता करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.

टीम इंडियाची पहिली इनिंग ही आज 329 रन्सवर आटोपली. या इनिंगमध्ये भारताकडून सर्वाधिक रन्स रोहित शर्माने (161) केल्या. तर अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांनीही हाफ सेंच्युरी झळकावली. पण या तीनही बॅट्समनशिवाय एकाही बॅट्समनला मोठी खेळी करता आली नाही. दरम्यान, आजच्या दिवसात टीम इंडियाने इंग्लंडची पहिली इनिंग संपवली. इंग्लंडचे सर्वच्या सर्व बॅट्समन हे 134 रन्सवर आऊट झाले. यावेळी फक्त फोक्सने सर्वाधिक ४२ धावा केल्या.

भारताकडून आर. अश्विनने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर एक विकेट मोहम्मद सिराजने घेतली. टीम इंडियाच्या या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडवर 195 रन्सची आघाडी घेतली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसऱ्या डावात भारताने एक विकेट गमावून 54 रन्स केल्या त्यामुळे सध्या 249 रन्सची आघाडी आहे. दरम्यान, पहिल्या इनिंगप्रमाणेच या इनिंगमध्ये भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कारण यावेळी देखील ओपनर शुभमन गिल हा झटपट आऊट झाला. दरम्यान, तिसऱ्या दिवशी अधिकाधिक रन्स करुन मोठी आघाडी घेण्याची संधी आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT