पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय महिलांचा पराभव, न्यूझीलंड १८ धावांनी विजयी
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाची सुरुवात पराभवाने झाली आहे. पहिल्याच टी-२० सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघावर १८ धावांनी मात केली आहे. विजयासाठी दिलेलं १५६ धावांचं आव्हान भारतीय महिलांना पेलवलं नाही, भारतीय महिलांचा संघ १३७ धावांपर्यंतच मजल मारु शकला. टॉस जिंकून भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुएझ बेट्स आणि कर्णधार सोफी डिव्हाईन […]
ADVERTISEMENT
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाची सुरुवात पराभवाने झाली आहे. पहिल्याच टी-२० सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघावर १८ धावांनी मात केली आहे. विजयासाठी दिलेलं १५६ धावांचं आव्हान भारतीय महिलांना पेलवलं नाही, भारतीय महिलांचा संघ १३७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.
ADVERTISEMENT
टॉस जिंकून भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुएझ बेट्स आणि कर्णधार सोफी डिव्हाईन यांनी न्यूझीलंडच्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी काही चांगले फटके खेळत ६० धावांची भागीदारी केली. दिप्ती शर्माने कर्णधार डिव्हाईनला बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने सुएझ बेट्स राजेश्वर गायकवाडच्या बॉलिंगवर आऊट झाली.
यानंतर न्यूझीलंडच्या मधल्या फळीपर्यंतच्या प्रत्येक फलंदाजाने उर्वरित ओव्हर्समध्ये काही महत्वपूर्ण योगदान दिलं, ज्याच्या जोरावर यजमान संघाने ५ विकेट गमावत १५५ धावांचा टप्पा गाठला. भारताकडून पुजा वस्त्राकर आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २-२ तर राजेश्वरी गायकवाडने १ विकेट घेतली.
हे वाचलं का?
प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनीही चांगली सुरुवात केली. यात्सिका भाटीया आणि शेफाली वर्मा जोडीने पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. अॅमेलिया केरने यात्सिकाला बाद करत भारताची जमलेली जोडी फोडली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरही फारशी चमक दाखवू शकली नाही. यानंतर एस. मेघनाने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला, परंतू दुर्दैवाने मधल्या फळीत तिला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही.
एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे भारतीय संघ महत्वाच्या क्षणी भागीदारी करु शकला नाही. अखेरीस १८ धावांनी सामना जिंकत एकमेव टी-२० सामन्यात बाजी मारली आहे. न्यूझीलंडकडून अॅमेलिया केर, हेली जेन्सन आणि जेस केर यांनी प्रत्येकी २-२ तर ले तहुहु आणि सोफी डिव्हाईन यांनी १-१ विकेट घेतली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT