Ind vs Aus Final Analysis: …म्हणून टीम इंडियाचा अंतिम सामन्यात झाला ‘गेम’, पराभवाची 5 मोठी कारणं

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

How did the Indian team riding on Vijayarath become the loser in the final?
How did the Indian team riding on Vijayarath become the loser in the final?
social share
google news

India vs Australia Final Match Analysis : टीम इंडियाचा विजयरथ ऑस्ट्रेलियालाही रोखणं अवघड जाईल असं वाटत असतानाच भारतीयांच्या पदरी निराशा पडली. आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये स्फोटक सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमावला नाही. टीम इंडियाने स्पर्धेतील सर्व 10 सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारत विजेतेपद पटकावून इतिहास रचेल, असे देशवासीयांना वाटत होते. पण, स्वप्नभंग झाला.

ADVERTISEMENT

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) अंतिम सामना खेळला गेला. 5 वेळा जगज्जेता राहिलेल्या ऑस्ट्रेलियाशी टीम इंडियाचा सामना झाला. या सामन्यात विजयरथावर स्वार झालेला भारतीय संघ पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले.

फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही संघ फ्लॉप ठरला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने 240 धावा केल्या आणि स्पर्धेत प्रथमच सर्वबाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने 4 विकेट्स गमावून सामना आणि विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाला पाच कारणीभूत ठरली.

हे वाचलं का?

गिल झाला लवकर बाद

अंतिम सामन्याचे दडपण सलामीवीर शुभमन गिलला पेलवले नाही, हे दिसून आले. 30 धावांवर भारतीय संघाला पहिला धक्का गिलच्या रूपाने बसला. 7 चेंडूत केवळ 4 धावा करून गिल बाद झाला. हा संघासाठी मोठा धक्का होता. गिलने आणखी काही धावा केल्या असत्या तर कर्णधार रोहित शर्मासोबत मोठी भागीदारी होऊ शकली असती. रोहित शर्मा आक्रमक खेळी करत असताना गिलने संयमी फलंदाजी करणे आवश्यक होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> मॅक्सवेलने कोहलीला मारला चेंडू, नंतर विराटने…; व्हिडिओ झाला व्हायरल

मागील 10 सामन्यांमध्ये सलामीच्या जोडीची चांगली सुरुवात, हे भारतीय संघाच्या विजयाचे प्रमुख कारण ठरले आहे. पण हीच गोष्ट अंतिम सामन्यात घडली नाही. गिल लवकर बाद होणे हे एक मोठे कारण होते, ज्यामुळे मोठी धावसंख्या होऊ शकली नाही.

ADVERTISEMENT

संथ फलंदाजी हेही ठरले मोठे कारण

गिलनंतर दुसरा धक्का रोहित शर्माच्या रूपाने 67 धावांवर बसला. त्यानंतर 81 च्या स्कोअरवर श्रेयस अय्यरच्या रूपाने तिसरा आणि सर्वात मोठा धक्का बसला. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत आल्याचे दिसून आले. इथून विराट कोहली आणि केएल राहुल यांनी मिळून डाव सांभाळला, पण दुसरीकडे रनरेट वाढवण्यात ते अपयशी ठरले.

कोहली आणि राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 109 चेंडूत 67 धावांची भागीदारी केली. पण, या भागीदारीत एक मोठी गोष्ट म्हणजे 11 ते 40 षटकांमध्ये फक्त दोन चौकार मारले गेले. केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या बॅटमधून हे दोन चौकार आले. आणि एक सांगायचं म्हणजे याच षटकांमध्ये कोहली, राहुल, रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार फलंदाज फलंदाजीला आले. मात्र प्रत्येकजण दडपणाखाली असल्याचे दिसून आले.

धावगती संथ ठेवल्याने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियासमोर 240 धावाचंच आव्हान उभं करता आलं. या सामन्यात विराट कोहलीने 63 चेंडूत 54 धावांची खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशिवाय केएल राहुलने 107 चेंडूत 66 धावांची खेळी केली. सूर्याने 28 चेंडूत 18 धावा केल्या. जडेजा 22 चेंडू खेळून केवळ 9 धावा करू शकला.

‘या’ 4 खेळाडूंना पेलवलं नाही अंतिम फेरीचे दडपण

संपूर्ण सामन्यात कोहली, राहुल आणि रोहित यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला जबाबदार खेळी करता आली नाही. यातील काही खेळाडूंवर अंतिम फेरीचे दडपण स्पष्टपणे जाणवले. ते सपशेल फ्लॉप ठरले. सलामीवीर गिल आणि रोहित बाद झाल्यानंतर श्रेयसला चौथ्या क्रमांकावर जबाबदारी स्वीकारावी लागली, मात्र तो 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

यानंतर रवींद्र जडेजा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याच्यानंतर सूर्यकुमार सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, मात्र त्यांची अवस्था आणखीनच बिकट होती. त्यामुळे हे चारही फलंदाज विश्वचषक स्पर्धेतील फायनलसारख्या मोठ्या सामन्याचे दडपण सहन करू शकले नसल्याचेच स्पष्ट झाले. यापैकी एकही फलंदाज क्रीजवर थांबला असता आणि थोड्याशा चांगल्या धावगतीने धावा केल्या असत्या तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

फिरकीपटू ठरले फ्लॉप

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 241 धावांचे लक्ष्य दिले तेव्हा चाहत्यांच्या आशा गोलंदाजांमुळे पल्लवीत झाल्या होत्या. येथे मोहम्मद शमीने 1 आणि जसप्रीत बुमराहने 2 बळी घेत विजयाच्या आशा वाढवल्या. ऑस्ट्रेलियाने 47 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. इथून सामना भारताच्या हातात आल्याचे चित्र निर्माण झाले होते.

हे ही वाचा >> टॉस जिंकूनही का केली नाही प्रथम फलंदाजी? कमिन्सने सांगितलं कारण

रोहित शर्माने बुमराह-शमीनंतर तिसरा आणि चौथा गोलंदाज म्हणून जडेजा-कुलदीप यादव या फिरकीपटूंचा वापर केला होता. मात्र हे दोन्ही गोलंदाज वाईटरित्या फ्लॉप ठरले. या दोघांनी आपली संपूर्ण षटके पूर्ण केली आणि एकही विकेट घेतली नाही. जडेजाने 43 तर कुलदीपने 56 धावा दिल्या. या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली असती, तरी सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागण्याची अपेक्षा खूप जास्त होती. फिरकीपटूंचा मारा निष्प्रभ ठरणे, हेही भारताच्या पराभवाचं एक मोठे कारण ठरले.

सिराजलाही करता आली नाही चांगली कामगिरी

कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला पाचवा पर्याय म्हणून ठेवले. रोहितने डावातील 17 वे षटक सिराजला दिले. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने 16 षटकांत 3 गडी गमावून 87 धावा केल्या होत्या. सिराजला एक बळी घेता आला असता, तर सामन्याचे चित्र बदलू शकले असते, कारण तोपर्यंत सामना भारताच्या हातात होता.

इथे गोष्ट सांगायची म्हणजे रोहितने सिराजला इतक्या उशीराने आणायला नको होतं. शमी आणि बुमराहने 47 धावांत 3 विकेट घेत दबाव निर्माण केला, तेव्हाच रोहित एका बाजूने फिरकी तर दुसऱ्या बाजूने सिराजला गोलंदाजी देऊ शकत होता. मात्र, असं असले तरी सिराजला गरजेच्या वेळी विकेट घेता आली नाही. शेवटी सामना हाताबाहेर गेला असताना त्याने एक विकेट घेतली. सिराजने सामन्यात 7 षटकात 45 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. म्हणजे सिराजही चांगलाच महागात पडला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT