Asian Games: चीनच्या भूमीत भारताचा इतिहास! सुवर्ण पदकांची केली लयलूट

मुंबई तक

भारताने आशियाई स्पर्धेत 100 सुवर्ण पदकांची कमाई करत नवा इतिहास रचला आहे. आशिया स्पर्धेतील आजच्या 14 व्या दिवशीच भारताने 100 पदकं जिंकली आहेत. यामध्ये 25 सूवर्ण, 35 रजत आणि 40 कांस्य पदकांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

asian games India won 100 gold medals Kabaddi team India in Asian Games Hangzhou All Medal Winners
asian games India won 100 gold medals Kabaddi team India in Asian Games Hangzhou All Medal Winners
social share
google news

Asian Games: आशियाई स्पर्धेत भारताने अब कि बार म्हणत 100 पार करत सुवर्ण पदकांची (gold medal) लयलूट केली. चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या (Indian player) या यशामुळे भारतान नवा इतिहास रचला आहे. या स्पर्धेतील खेळाडूंनी अनेक खेळात मिळवलेल्या यशामुळे ही पदकांची संख्या आणखी ही वाढण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या अतुलनीय खेळामुळे हांगझोऊमध्ये नवा इतिहास रचला आहे.

कबड्डी संघाचे शंभरावे सुवर्ण

भारताच्या मुलींच्या संघाने कबड्डीमध्ये आज सुवर्णपदक जिंकत देशाला 100 वे पदक प्राप्त करुन दिलेय यापूर्वी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 70 पदकं जिंकली होती. हांगझोऊमध्येही सर्वच प्रकारातील खेळाडूंची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. देशाच्या खेळाडूंनी सुवर्ण पदकांची लयलूट केल्यामुळे चीनमध्ये देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावला आहे.

हे ही वाचा >>‘बॉलीवूड’मध्ये अंडरवर्ल्डचा पैसा, महादेव बेटिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई

तिरंदाजीमध्ये अव्वल

आशिया स्पर्धेतील आजच्या 14 व्या दिवशीच भारताने 100 पदकं जिंकली आहेत. यामध्ये 25 सूवर्ण, 35 रजत आणि 40 कांस्य पदकांचा समावेश आहे. तिरंदाजीमध्ये भारताच्या ज्योती वेन्नमने सुवर्ण पदक प्राप्त केले असून अदिती स्वामीने कंपाऊंड तिरंदाजीमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. या दोन पदकांच्या बळावरच भारताने पदकांच्या बाबतीत शंभरी पार केली आहे.

पदकांची लूट

आशियाई स्पर्धेत भारताकडून आज तीन सुवर्ण, एक रजत आणि एक कांस्य पदकांची कमाई करण्यात आली आहे. आदिती स्वामीने कंपाऊंड तिरंदाजीत कांस्य तर ज्योती वेन्नम आणि ओजस देवताळे यांनी कंपाऊंड तिरंदाजीत प्रत्येकी एक सूवर्णपदक मिळवले आहे. अभिषेक वर्माने कंपाऊंड तिरंदाजीमध्ये रजत पदक मिळवून भारताची शान वाढवली आहे. तर महिला कबड्डी टीमनेही सूवर्ण पदकांची कमाई करून भारताचा तिरंगा फडकवत ठेवला आहे. खेळाडूंच्या या यशामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp