महिला क्रिकेट टीमचा ऐतिहासिक विजय; 36 धावांवर टीम केली ऑलआउट, 6 ओव्हरमध्ये संपवला सामना
भारतीय महिला क्रिकेट टीमने आशिया कपमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महिला आशिया कपमध्ये टीम इंडियाची दमदार कामगिरी कायम आहे. सोमवारी थायलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने कमालच केली. टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करताना थायलंडचा डाव अवघ्या 37 धावांत आटोपला आणि नंतर 6 षटकांत लक्ष गाठून सामना जिंकला. 36 धावांवर थायलंडचा संपूर्ण संघ तंबूत या सामन्यात भारताने नाणेफेक […]
ADVERTISEMENT

भारतीय महिला क्रिकेट टीमने आशिया कपमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महिला आशिया कपमध्ये टीम इंडियाची दमदार कामगिरी कायम आहे. सोमवारी थायलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने कमालच केली. टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करताना थायलंडचा डाव अवघ्या 37 धावांत आटोपला आणि नंतर 6 षटकांत लक्ष गाठून सामना जिंकला.
36 धावांवर थायलंडचा संपूर्ण संघ तंबूत
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जो ऐतिहासिक ठरला. टीम इंडियाला तिसर्याच षटकात पहिले यश मिळाले आणि त्यानंतर थायलंडची विकेट पडण्याची प्रक्रिया सुरू झाली. थायलंडकडून केवळ सलामीवीर नानापत कोन्चारोकाई दुहेरी आकडा गाठू शकली, ती वगळता सर्व फलंदाज 10 पेक्षा कमी धावा करू शकले.
भारताकडून या सामन्यात स्नेह राणाने 3, राजेश्वरी गायकवाडने 2, दीप्ती शर्माने 2 आणि मेघना सिंगने 1 बळी घेतला.