Omicron Varient : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा ठरल्याप्रमाणेच होणार – सौरव गांगुली
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे सध्या संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. भारतातही या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शासनाने बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध कडक केले आहेत. अशा परिस्थितीत डिसेंबर महिन्यात टीम इंडियाच्या प्रस्तावित दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परंतू बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा ठरल्याप्रमाणेच होणार आहे. “दक्षिण आफ्रिका दौरा […]
ADVERTISEMENT
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे सध्या संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. भारतातही या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शासनाने बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध कडक केले आहेत. अशा परिस्थितीत डिसेंबर महिन्यात टीम इंडियाच्या प्रस्तावित दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
ADVERTISEMENT
परंतू बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा ठरल्याप्रमाणेच होणार आहे.
“दक्षिण आफ्रिका दौरा हा ठरल्या प्रमाणेच होणार आहे. आमच्याकडे निर्णय घेण्यासाठी बराच कालावधी आहे. पहिला कसोटी सामना १७ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. आम्ही परिस्थिती पाहून निर्णय घेऊ”, एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये बोलत असताना गांगुलीने पत्रकारांना ही माहिती दिली. न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार होती.
हे वाचलं का?
IPL Retention : रोहित मुंबईकडून, धोनी चेन्नईकडून तर विराट RCB कडून खेळणार, संघमालकांकडून नावं जाहीर
खेळाडूंची सुरक्षा आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहणं हे बीसीसीआयसाठीचं पहिलं प्राधान्य आहे. यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल ते आम्ही करु. येणाऱ्या दिवसांमध्ये काय होतंय यावर आमची नजर आहे असंही गांगुली म्हणाला. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दोन्ही संघ ३ कसोटी, ३ वन-डे आणि ४ टी-२० सामने खेळणार आहे.
ADVERTISEMENT
यावेळी बोलत असताना सौरव गांगुलीने टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला आपला पाठींबा दिला आहे. हार्दिकने काही दिवसांपूर्वी निवड समितीला, मी फिटनेसवर काम करत असून माझा पुढचे काही दिवस संघात निवडीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली होती.
ADVERTISEMENT
Omicron Variant : आफ्रिकेसह इतर देशातून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
“हार्दिक खूप चांगला खेळाडू आहे. पण तो सध्या तंदुरुस्त नसल्यामुळे तो संघात नाहीये. तो तरुण आहे आणि मला आशा आहे की या दुखापतीमधून सावरत तो लवकरत संघात पुनरागमन करेल.” त्यामुळे बीसीसीआय आता आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याबद्दल काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT