कुस्तीपटू विरुद्ध पीटी उषा वाद तापला; साक्षी मलिक, बजरंग पुनियांचे आक्रमक प्रत्तुत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Controversy between wrestler and former athlete, Indian Olympic Association (IOA) president PT Usha continues
Controversy between wrestler and former athlete, Indian Olympic Association (IOA) president PT Usha continues
social share
google news

दिल्ली L]: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात जंतर मंतरवर सुरु असलेलं कुस्तीपटूंचे आंदोलन अद्याप सुरुच आहे. आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांसारख्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक विजेत्या खेळाडूंचा समावेश आहे. (Controversy between wrestler and former athlete, Indian Olympic Association (IOA) president PT Usha continues)

सद्यस्थितीत न्यायालयाच्या आदेशाने ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, मात्र खेळाडू त्यांच्या अटकेच्या मागणीवर ठाम आहेत.

दुसरीकडे आंदोलनाला बसलेले कुस्तीपटू आणि माजी खेळाडू, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या अध्यक्षा पीटी उषा यांच्यातील वाद कायम आहे. पीटी उषा यांनी खेळाडूंच्या आंदोलनावर टीका केली होती. हे शिस्तीला धरुन नसल्याच त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, आता आंदोलन करणाऱ्या सर्व पैलवानांनी पीटी उषा यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय म्हणाल्या होत्या पीटी उषा?

पैलवानांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना पीटी उषा म्हणाल्या होत्या की, जंतरमंतरवरील कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे देशाची बदनामी होत आहे. आंदोलन करण्यापूर्वी त्यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या ऍथलीट्स कमिशनकडे तक्रार करायला हवी होती. पीटी उषा नुकत्याच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या.

IPL 2023: पॉवरप्लेमध्ये विराटसह ‘हे’ तगडे फलंदाज करतायेत ‘टूकटूक’

या बैठकीनंतर त्या म्हणाल्या, “लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि अॅथलीट्स कमिशनची समिती आहे. रस्त्यावर उतरण्याऐवजी त्यांनी (कुस्तीपटू) आमच्याकडे यायला हवे होते, पण ते आले नाहीत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, यावर ते ठाम आहेत. पण थोडी शिस्त असावी, असं मला वाटतं. आमच्याकडे न येता ते थेट रस्त्यावर उतरले आहेत, हे खेळासाठी चांगले नाही. ते जे करत आहेत ते देशाच्या प्रतिमेसाठी चांगले नाही.

ADVERTISEMENT

कुस्तीपटूंचे पीटी उषा यांना जोरदार प्रत्यूत्तर :

पीटी उषा यांच्या वक्तव्याचा निषेध करत कुस्तीपटूंनी खेद व्यक्त केला. पीटी उषा यांनी त्यांच्या आंदोलनाचा आणि भूमिकेचा आदर करावा, असं पैलवानांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

बजरंग पुनिया म्हणाला, “अलीकडेच उषा मॅम यांनी ट्विट केले होते की काही लोकांनी गुंडगिरीचा अवलंब करून त्यांच्या अकादमीच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देशाची प्रतिमा मलिन होत नव्हती का, हे त्यांनी मला सांगावे. जर त्या राज्यसभेची खासदार होऊन त्यांची अकादमीची जमीन वाचवू शकत नसतील, तर आमच्यासारख्या सामान्य कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण सिंग यांच्याविरुद्ध लढण्याची आणि जिंकण्याची अपेक्षा कशी करायची? उषा मॅडम यांनी आपल्या विधानाने कुस्तीगीरांची निराशा केली आहे.

IPL 2023: एका ओव्हरमध्ये 4 सिक्स मारणाऱ्या खेळाडूवर कारवाई; बसला लाखोंचा फटका!

पी.टी. उषा यांच्यातील संवेदनशीलतेचा अभाव अत्यंत खेदजनक आहे, असं म्हणतं विनेश फोगटने त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. विनेश फोगटही म्हणाली की “आम्ही देशाची राज्यघटना पाळतो. पण आम्ही रस्त्यावर बसलो तर आमची काही मजबुरी आहे. कारण आमचे कोणी ऐकले नाही. अशा परिस्थितीत आम्हाला जनतेसमोर यावे लागले. पी.टी. उषा यांना आम्ही आमचे मोठे आयकॉन मानतो. पण महिलांबद्दल त्यांचे असे बोलणे, अजिबात संवेदनशील नसणे, हे खूपच दुःखदायक आहे.”

विनेश म्हणाली, “मी त्यांना वैयक्तिकरित्या फोनही केला होता. पण त्यांनी फोन उचलला नाही. पीटी उषा मॅडमच्या बाबतीत असे घडले असते, तर त्यांनी इतका वेळ वाट बघितली असती का? हे त्यांचेच शब्द आहेत का, की त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे, हे आम्हाला माहीत नाही. पण त्या आयओएच्या अध्यक्षा आहेत, मात्र त्यांनाही माध्यमांसमोरच येऊन म्हणावं लागलं होतं की, त्यांची अकादमी उद्ध्वस्त होत आहे. जी व्यक्ती स्वत:ला न्याय देऊ शकत नाही त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करावी? ”

WTC Final : अजिंक्य रहाणेचं नशीब फळफळलं, थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येच संधी

पीटी उषा यांच्या वक्तव्यावर कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली, “मी पीटी उषा यांचा आदर करते. त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली आहे. पण मला मॅडमना विचारायचे आहे की महिला कुस्तीपटू पुढे आल्या आहेत, त्यांनी छेडछाडीचा मुद्दा उपस्थित केला आहे. आपणही निषेध करू शकत नाही का? आम्ही आयओए समितीमध्ये आमचे म्हणणे मांडले. आयओए समितीच्या सदस्यांनाही अश्रू अनावर झाले. कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र कारवाई झाली नाही.

गीता फोगट म्हणाली, “ज्या व्यक्तीवर असे गंभीर आरोप झाले आहेत त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही आणि पीटी उषा खेळाडूंना बेशिस्त म्हणत आहेत.” एक स्त्री आणि क्रीडापटू असल्यामुळे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे अत्यंत लज्जास्पद आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT